Birds Care: पक्ष्यांना फरसाण, पाव देताय? सावधान! आता थेट कारवाई होणार
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Birds Care: प्रेक्षणीय स्थळे आणि पाणवठ्यावर येणाऱ्या पक्षांना फरसाण, पाव दिल्यास थेट कारवाई होणार आहे. वन विभागाने याबाबत नियमावली जारी केलीये.
जालना: प्रेक्षणीय स्थळे, उद्याने आणि पाणवठ्यावर देशी आणि विदेशी पक्ष्यांना अनेकांकडून खाद्यपदार्थ दिले जातात. मात्र बऱ्याचदा अप्रमाणित खाद्य पदार्थ म्हणजेच पाव, चपाती, फरसाण, भात, शेव हे देणे पक्ष्यांच्या जीवावर बेतू शकते. असे खाद्यपदार्थ देणे नियमबाह्य असून ते देणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई होणार आहे. वन विभागाकडून याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
देशी-विदेशी पक्ष्यांना पाव, चपाती, फरसाण, भात, शेव तसेच इतर तेलकट पदार्थ देणे नियमबाह्य आहे. पक्षी हे नैसर्गिक खाद्य खात असतात. त्यांना अर्टिफिशयल किंवा जंक फूड दिल्यास त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणा होतो. त्यामुळे पक्ष्यांना अशा प्रकारचे अन्न देणे धोकादायक ठरू शकते, अशी माहिती जालन्यातील पक्षी मित्र ज्ञानेश्वर गिराम यांनी दिली आहे.
advertisement
पक्ष्यांचे खाद्य वेगळे
पक्ष्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत प्रचंड विविधता आढळते. फुलातील मकरंद, फळे, लहान रोपे, छोटे प्राणी, साप विविध प्रकारचे किडे पक्षी खातात. काही शिकारी पक्षी वगळता इथर पक्ष्यांचे किडेच हेच आवडते अन्न असते. मात्र, पक्ष्यांना भात, पाव, शेव दिल्यास ते त्यांच्या आरोग्यास हानीकारक ठरते.
advertisement
ब्रेडचे तुकडे टाकू नयेत
पक्ष्यांना अन्न देऊन त्यांच्या जीविताशी खेळणाऱ्यांवर पक्षीप्रेमी आणि पक्षी अभ्यासकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रेक्षणीय ठिकाणी पक्ष्यांचा वावर असतो आणि पर्यटकांची गर्दी असते. अशा ठिकाणी पक्ष्यांना अन्न न देण्याच्या सूचनांचे फलक लावणे गरजेचे पक्षीमित्र सांगतात. विशेष म्हणजे पक्ष्यांना सतत उरलेले अन्न दिले गेल्यास कालांतराने पक्षीदेखील स्वतःचे अन्न शोधणे सोडून देतात. ते इतरांच्या मदतीवर अवलंबून राहतात. त्यामुळे श्रद्धेपोटी किंवा इतर कुठल्याही कारणाने पक्ष्यांना ब्रेडचे तुकडे, पोळी किंवा इतर वस्तू खाण्यासाठी देऊ नयेत हे तितकेच महत्त्वाचे आहे.
advertisement
नियमाचे उल्लंघन केल्यास दंड
पक्ष्यांना भाकर किंवा ब्रेड खाऊ घातल्यास दंड आकारला जाऊ शकते. त्यामुळे पक्ष्यांना अशा प्रकारचे अन्न देणे टाळले पाहिजे. जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध जातींचे पक्षी येतात. त्यांना कुठलेही अन्न पदार्थ खायला देऊ नयेत. यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो असं पक्षी निरीक्षक ज्ञानेश्वर गिराम यांनी सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Mar 13, 2025 10:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Birds Care: पक्ष्यांना फरसाण, पाव देताय? सावधान! आता थेट कारवाई होणार










