महिनाभरापूर्वीच बाप्पाच्या खरेदीसाठी भाविकांची लगबग, पाहा मार्केटमध्ये काय आहे खास?

Last Updated:

गणेशोत्सव जवळ येतोय. त्यामुळे ढोल ताशा पथक पासून ते मूर्ती बनविणाऱ्या कारागीरापर्यंत सगळेच कामाला लागले आहेत.

+
News18

News18

जालना, 8 ऑगस्ट : गणेशोत्सव जवळ येतोय. त्यामुळे ढोल ताशा पथक पासून ते मूर्ती बनविणाऱ्या कारागीरापर्यंत सगळेच कामाला लागले आहेत. जालना शहरात देखील गणेश मूर्ती बनवण्याचे काम जवळपास पूर्ण झालंय. सध्या मूर्तीवर अखेरचा हात मारण्याचं काम सुरू आहे. पाहूया यंदा काय आहे विशेष ट्रेंड
जालना शहरातील नवा मोंढा रस्त्यावर राजस्थानी कलाकार एप्रिल महिन्यापासून गणेश मूर्ती घडविण्याचे काम करत आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या या मुर्तींना आता अखेरचा हात मारण्याचं काम सुरू आहे. राजस्थानमधील चंपालाल बावरी हे दरवर्षी काही महिन्यासाठी जालना शहरात येवून मूर्ती बनवण्याचं काम करतात. सर्वच साहित्य महाग झाल्यानं मूर्ती तयार करण्याचा खर्चात वाढ झाल्याचे चंपलाल सांगतात.
advertisement
गणेश उत्सवाला महिनाभराचा अवधी शिल्लक असला तरी आतापासूनच मूर्ती खरेदीसाठी चौकशी सुरु झालीय. एक फूट उंचीच्या गणेश मूर्ती पासून ते 5 फूट उंची असलेल्या मूर्ती इथं उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आकर्षक रंगातील, विविध आकाराच्या सुंदर मूर्ती बनवून तयार झाल्या आहेत. 150 रुपयांपासून ते 10 हजार रुपये किमतीपर्यंतच्या आकर्षक मूर्ती या ठिकाणी उपलबध आहेत.
advertisement
आम्ही पोट भरण्यासाठी राजस्थानातून इथे मार्च - एप्रिल महिन्यात येतो. गणेशोत्सवात गणेश मूर्ती, त्यानंतर दिवाळी साठी विविध आकर्षक वस्तू तयार करतो. सगळ्याच कच्च्या मालाचे दर वाढल्याने नफा कमी झाला आहे, अशी माहिती मूर्तिकार चंपालाल बावरी यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
महिनाभरापूर्वीच बाप्पाच्या खरेदीसाठी भाविकांची लगबग, पाहा मार्केटमध्ये काय आहे खास?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement