मराठवाड्यातील या जिल्ह्यात येलो अलर्ट, तर दक्षिण कोकणातही अती मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याने काय म्हटलं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33°C आणि 25°C च्या आसपास असेल.
नारायण काळे, प्रतिनिधी
मुंबई : मागील काही दिवसांपासून दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. तर मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप घेतली आहे. पुढील दोन दिवस दक्षिण कोकणात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो.
तसेच मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भामध्ये 30 ते 40 किमी प्रति तास एवढ्या वेगाने वारे वाहून हलक्या स्वरूपाच्या पाऊस होईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे उद्या 27 जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील, याबाबत लोकल18 ने विशेष आढावा घेतलेला आढावा जाणून घेऊयात.
advertisement
ठाणेकरांसाठी मोठी बातमी! 2 दिवस पाणी जपून वापरा, महापालिकेने सांगितलं यामागचं महत्त्वाचं कारण
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33°C आणि 25°C च्या आसपास असेल. कोकणातील रायगड, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना 27 जून साठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांमध्येही जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामानाने भागाने वर्तवली.
advertisement
पुण्यामध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये होऊ शकतो. तर सातारा आणि कोल्हापूरमध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नसल्याने या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसली तरी हलक्या स्वरूपाच्या सरी होऊ शकतात.
advertisement
या जिल्ह्यांना येलो अलर्ट -
मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 27 जून रोजी होऊ शकतो. तर विदर्भात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून बुलढाणा अकोला यवतमाळ आणि वाशिम हे जिल्हे वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.
Location :
Maharashtra
First Published :
June 26, 2024 7:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
मराठवाड्यातील या जिल्ह्यात येलो अलर्ट, तर दक्षिण कोकणातही अती मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याने काय म्हटलं?