advertisement

परभणीतील घटनेचे जालन्यात पडसाद, मार्केट बंद, शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन

Last Updated:

Jalna Market Closed: परभणीतील घटनेचे पडसाद जालन्यात उमटत असून आज कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे.  

परभणीतील घटनेचे जालन्यात पडसाद, मार्केट बंद, शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन
परभणीतील घटनेचे जालन्यात पडसाद, मार्केट बंद, शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन
जालना: परभणीतील घटनेचे पडसाद जालन्यात देखील उमटत आहेत. त्यामुळे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार आज, शनिवारी बंद राहणार आहेत. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजारपेठेत विक्रीस आणू नये, असं आवाहन बाजार समितीचे सचिव मोहन राठोड यांनी केला आहे. परभणी येथील घटनेनंतर पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाल्याने दलित संघटना आक्रमक झाले असून त्यांनी बंदच आवाहन केला आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण दिवसभर जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार बंद असणार आहेत शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस न आणता आपली गैरसोय टाळावी असं आवाहन करण्यात आला आहे.
जालना कृषि उत्पन्न बाजार समिती, जालनाचे बाजार आवारातील सर्व व्यवहार शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालना बंदचे अवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात काशीनाथ मगरे व इतरांनी बाजार समितीला म पत्र देवुन बंद ठेवण्याचे अवाहन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज आपला शेतीमाल विक्रीसाठी आणू नये व आपली होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक आमदार अर्जुनराव खोतकर तथा मोहन राठोड यांनी केले आहे.
advertisement
दरम्यान, जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती जालना जिल्ह्याबरोबरच बुलढाणा, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. या सर्व जिल्ह्यातील शेतकरी आपला शेतमाल विक्री करण्यासाठी जालना बाजार समितीला प्राधान्य देतात. विस्तीर्ण आवार व बाजार समितीमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांमुळे तसेच बाजार समितीत मिळत असलेल्या योग्य दर, पारदर्शक व्यवहारांमुळेही जालना बाजार समितीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचा पाहायला मिळतं. भुसार मालाच्या व्यवहाराबरोबरच मोसंबी मार्केट, रेशीम कोष मार्केट, भाजीपाला मार्केट, मिरची मार्केट, गुळ मार्केट, किराणा व स्टील मार्केट आदी कारणांसाठी जालना कृषी उत्पन्न बाजार समिती प्रसिद्ध आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
परभणीतील घटनेचे जालन्यात पडसाद, मार्केट बंद, शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement