तब्बल 135 वर्षांची परंपरा, महाराष्ट्रात 'या' ठिकाणी राजा करतो रेवड्यांची उधळण, काय आहे हा प्रकार?

Last Updated:

हत्तीवरून निघणारी राजाची मिरवणूक जालना शहरात 1889 पासून निघत आहे. प्रतिकात्मक राजा हत्तीवरून प्रजेला रेवड्या वाटतो.

+
तब्बल

तब्बल 135 वर्षांची परंपरा, महाराष्ट्रात 'या' ठिकाणी राजा करतो रेवड्यांची उधळण, काय आहे हा प्रकार?

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : देशभर होळीचा उत्साह हा ओसंडून वाहत आहे. एकमेकांना रंग लावून रंगांचा हा रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना देशातील अनेक भागांमध्ये विविध अनोख्या प्रथा परंपरा साजरा केल्या जातात. अशीच वेगळी परंपरा जालना शहरामध्ये मागील 135 वर्षांपासून पाळली जात आहे. हत्तीवरून निघणारी राजाची मिरवणूक जालना शहरात 1889 पासून निघत आहे. प्रतिकात्मक राजा हत्तीवरून प्रजेला रेवड्या वाटतो. प्रजादेखील राजावर फुलांचा तसेच रंगांचा वर्षाव करते अशी ही परंपरा तब्बल 135 वर्ष जुनी आहे.
advertisement
जालना शहरातील नागरिकांनी ती आजतागायत जिवंत ठेवली आहे. विशेष म्हणजे ज्या रस्त्यावरून हत्ती जातो त्या ठिकाणी रंग खेळणे बंद केलं जातं. यंदा असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा वापर न करता कोरडे रंग आणि फुलांची होळी खेळण्याचा स्तुत्य निर्णय हत्ती रिसाला समितीने घेतला आहे.
नाईलाज! लपून बसला जावई, मित्रांनी केला दगा; गावकऱ्यांनी काढली गाढवावरून मिरवणूक, जपली परंपरा
पुर्वी म्हणजेच सन, 1889 पासून होळी उत्सव दांडी पौर्णिमापर्यंत म्हणजेच एक महिना चालायचा. त्यावेळेच्या जालन्यातील काही मित्रांनी एकत्र येतं हत्ती रिसाला समितीची स्थापना केली होती. जास्त दिवस चालणारा सण म्हणून हा उत्सव परिचित असून, पूर्वी लोक शिवीगाळ करीत जास्त प्रमाणात पाणी आणि रंगाचा यासाठी वापर करीत होते. ही परंपरा कमी व्हावी आणि आगळी वेगळी परंपरा चालू व्हावी, या हेतुने विश्वासराव आवळे आणि मित्र कंपनीने सन 1889 वर्षी धुलीवंदन हत्ती रिसाला मिरवणुकीचे आयोजन केले होते.
advertisement
Holi 2024: नवऱ्याची भांग कशी उतरवायची? 5 लय भारी उपाय
त्यात राजा, प्रधान आणि भारतमातेचा देखावा करून ही मिरवणूक काढण्यात आली होती. ज्या मार्गाने ही मिरवणूक जाईल त्या मार्गावरील मिरवणुकीनंतर रंग खेळणे बंद होते.  अशी परंपरा असून, ती आजतागायत सुरु आहे. शहरातील रंगार खिडकी, काद्राबाद येथुन सराफा रोड, फुलबाजार, दाना बाजार, शोला चौक, बडीसडक, राम मंदीर, फुल बाजार, महावीर चौक, पाणीवेस कुंभार गल्लीमागे जावून पुन्हा रंगार खिडकी येथे मिरवणुकीचा समारोप होतो, असं हत्ती रीसाला समितीचे अध्यक्ष अंकुश राऊत यांनी सांगितले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
तब्बल 135 वर्षांची परंपरा, महाराष्ट्रात 'या' ठिकाणी राजा करतो रेवड्यांची उधळण, काय आहे हा प्रकार?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement