माओवाद्यांशी लढताना साताऱ्याच्या सुपुत्राला वीरमरण, आयडी स्फोटात शहीद
- Published by:sachin Salve
Last Updated:
साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील बावडा येथील ते रहिवासी होते. अमर पवार यांना वीरमरण यांची माहिती गावात पसरताच गावावर शोककळा पसरली.
सचिन जाधव, प्रतिनिधी
सातारा: महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. अशातच छत्तीसगडमधून मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 2 जवान जखमी झाले आहे. शहीद जवानामध्ये साताऱ्यातील सुपुत्राचा समावेश आहे. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमर शामराव पवार असं या शहीद जवानाचं नाव आहे. अमर पवार हे मुळचे साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील बावडा येथील रहिवासी होते. अमर पवार यांना वीरमरण यांची माहिती गावात पसरताच गावावर शोककळा पसरली. छत्तीसगड इथं नारायणपूर जिल्ह्यात ओरचा भागातून माओवाद्यांच्या विरोधात जंगलात अभियान राबवण्यासाठी डीआरजी आयटीबीटीसह तीन विशेष पथकं गेली होती. अभियान राबवून परत येत असताना माओवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 2 जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. शहीद अमर पवार हे आयटीबीपी 53 बटालियनचे जवान होते. अमर पवार यांच्या मृत्यू बातमी समजताच गावावर शोककळा पसरली आहे. अमर पवार यांचं पार्थिव लवकरच गावात आणले जाणार आहे. त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
Location :
Chhattisgarh
First Published :
October 19, 2024 8:32 PM IST


