कराड दक्षिण विधानसभा निवडणूक 2024 : भाजपचे अतुल भोसले पृथ्वीबाबांची हॅट्ट्रीक रोखणार का? 

Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024, Karad South Assembly Constituency : महाविकास आघाडीकडून पृथ्विराज बाबा हॅटट्रिक साधण्यासाठी पुन्हा रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीने भाजपचे खंदे कार्यकर्ते आणि नेते डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी दिली आहे.

कराड दक्षिण विधानसभा निवडणूक 2024
कराड दक्षिण विधानसभा निवडणूक 2024
सातारा : जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचं महत्त्वाचं केंद्र म्हणजे कराड. सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये एक आहे कराड दक्षिण. माजी मुख्यमंत्र्यांचा हा मतदारसंघ. विद्यमान आमदार आहेत पृथ्विराज चव्हाण. आता महाविकास आघाडीकडून पृथ्विराज बाबा हॅटट्रिक साधण्यासाठी पुन्हा रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीने भाजपचे खंदे कार्यकर्ते आणि नेते डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादीतले बंडखोर आणि वंचितचे संजयगाडे यामुळे कराड दक्षिणची निवडणूक पृथ्विराज बाबांसाठी सोपी ठरणार नाही.
कराड हे महाराष्ट्राला मुख्यमंत्री देणारं शहर. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं गाव. कृष्णा-कोयना यांच्या प्रीतिमसंगमावर वसलेलं हे शहर राज्याच्या शुगर बेल्टमधलं महत्त्वाचं शहर. ऊस कारखानदारीबरोबर इथे शिक्षण क्षेत्रही बहरत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभेत काँग्रेसशिवाय इतर कोणत्याही पक्षाचा आजवर विजय झालेला नाही. पण यंदा मात्र या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने कडवं आव्हान निर्माण केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी याची झलक दिसली.
advertisement
कराड दक्षिणविधानसभा मतदारसंघ इतिहास
भारतीय निवडणुकांच्या इतिहासात पहिल्या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता दक्षिण कराडमधून सातत्याने काँग्रेसचा उमेदवार निवडून येत आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून यशवंतराव मोहिते यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर यशवंतराव मोहिते हे काँग्रेस पक्षात आले. 1962 ते 1978 पर्यंतच्या चार निवडणुकीत यशवंतराव मोहिते यांनी काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवला. त्यानंतर 1980 पासून 2009 पर्यंत लागोपाठ सात निवडणुकांमध्ये विलासराव पाटील उंडाळकर दक्षिण कराडचे आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमध्ये उमेदवारी दिली गेली. तेव्हापासून सलग दोनवेळा पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणचे प्रतिनिधित्व करत आहेत. पण तेव्हापासून पृथ्वीराज चव्हाणांना उंडाळकरांच्या गटाशीही दोन हात करावे लागत आहेत.
advertisement
2014 मध्ये विलासराव पाटील उंडाळकर राष्ट्रवादीकडून लढले पण पृथ्वीराज बाबांनी त्यांचा पराभव केला. तेव्हा विधानसभा निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच कराडमध्ये लक्षणीय मतं मिळवली होती. त्या वेळी अतुल भोसले रिंगणात होते.  2019 मध्ये विलासरावांचे पुत्र उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. भाजपानेही डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी देऊन त्यांच्यापाठी ताकद उभी केली. तरीही 9050 च्या मताधिक्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवला. पृथ्वीराज बाबांचं मताधिक्य जवळपास निम्म्याने कमी झालं होतं.
advertisement
2019 विधानसभा निकाल
पृथ्वीराज चव्हाण- काँग्रेस – 92296
डॉ. अतुल भोसले – भाजप – 83166
उदयसिंह पाटील उंडाळकर – अपक्ष - 29401
2019 च्या निवडणुकीत भाजपने काँग्रेस आघाडीपुढे कडवं आव्हान निर्माण केलं होतं. डॉ. अतुल भोसले यांनी तब्बल 83166 मतं घेतली. तर पृथ्वीराज चव्हाण यांना 92296 मतं मिळाली.
पृथ्वीराज चव्हाणांसमोर भाजपचं आव्हान
गेल्या चार वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि त्यात काँग्रेसचा सहभाग होता. ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री असूनही पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात कुठेच नव्हते आणि अन्य मोठ्या पदावरही नव्हते. त्यांचं वयही आता 79 वर्षांचं आहे. पण काँग्रेसने कुठलाही धोका न पत्करता या ज्येष्ठ नेत्यालाच उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्यासमोर असलेलं उंडाळकर गटाचं आव्हानही संपल्यात जमा आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उदयसिंह उंडाळकर एकत्रित प्रचार करताना दिसले होते. पण सातारा जिल्ह्यातला भाजपचा वाढता प्रभाव आणि मराठी विरुद्ध दलित-ओबीसी राजकारण याचा धोका चव्हाण यांना असू शकतो.
advertisement
2024 लोकसभा निवडणुकीत काय झालं?
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात येतो. साताऱ्यात या लोकसभा निवडणुकीच्या वेळी हाय व्होल्टेज उमेदवार होते. महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीचे उदयनराजे भोसले यांच्यात लढत झाली. भाजपचे उदयनराजे यांनी निवडणुकीत बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांचा उदयनराजे यांना 5 लाख 71 हजार 134 मते मिळाली. त्यांनी शिंदे यांचा 32771 मतांच्या फरकाने पराभव केला. सातार लोकसभेवर यंदा पहिल्यांदाच भाजपाचा खासदार झाला आहे. त्यामुळे साताऱ्यातील भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात विजय प्राप्त करण्याची जबाबदारी पक्षाने उदयनराजेंकडे दिली असल्याच्या बातम्या आहेत.
advertisement
कराड दक्षिणमधून इतिहासात पहिल्यांदाच भाजपला मताधिक्य मिळालं. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असूनही कराड दक्षिणमध्ये श्रीनिवास पाटील या आघाडीच्या उमेदवाराला 30 हजारांचं मताधिक्य होतं. आता मताधिक्य घटेल अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात शशिकांत शिंदे कराडमध्ये 600 मतांनी पिछाडीवर पडले. त्यामुळे भाजपचा आणि अतुल भोसले यांचा आत्मविश्वास वाढला आहे. असंच चित्र विधानसभेत दिसलं तर भोसले जाएंट किलर ठरू शकतील.
advertisement
सातारा जिल्ह्यातील विद्यमान आमदार आणि त्यांची भूमिका
  1. सातारा जावळी- शिवेंद्रराजे भोसले- भाजप
  2. वाई - मकरंद पाटील – राष्ट्रवादी
  3. फलटण- दीपक चव्हाण – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
  4. माण खटाव- जयकुमार गोरे- भाजप
  5. कोरेगाव- महेश शिंदे- शिवसेना
  6. कराड उत्तर - बाळासाहेब पाटील – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
  7. कराड दक्षिण - पृथ्विराज चव्हाण - कॉंग्रेस
  8. पाटण - शंभुराजे देसाई – शिवसेना
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कराड दक्षिण विधानसभा निवडणूक 2024 : भाजपचे अतुल भोसले पृथ्वीबाबांची हॅट्ट्रीक रोखणार का? 
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement