State Bank Of India दरोडा: २० किलो सोने, दीड कोटी रुपये लंपास, पत्र्याच्या घरावर बॅग सापडली, दरोड्याचं सोलापूर कनेक्शन

Last Updated:

Karnataka SBI Robbery: मंगळवेढ्यातील हुलजंतीमध्ये मिळाली इको व्हॅन , दरोडेखोरांनी घरावर ठेवलेल्या बॅगेत मिळालेले ६.५ किलो सोने आणि ४१.५ लाख रोकड या दरोड्याचे सोलापूर कनेक्शन समोर आले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया दरोडा प्रकरण
स्टेट बँक ऑफ इंडिया दरोडा प्रकरण
विजापूर : कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील चडचणमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. या दरोड्यात बँकेच्या लॉकरमधील कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोकड लंपास झाले होते. या चोरीमुळे संपूर्ण कर्नाटक जिल्हा हादरून गेला आहे. एखाद्या सिनेमाला शोभेल असा हा दरोड्याचा संपूर्ण घटनाक्रम होता.

कसा पडला दरोडा?

कर्नाटकच्या चडचण परिसरातील भीमातीर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर मंगळवारी संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली. कर्मचारी गेटला कुलूप न लावता काम करत असताना, तीन मुखवटा घातलेले लोक शाखेत घुसले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना पिस्तूल आणि चाकूने धमकावले. त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांकडून स्ट्राँग रूममधून माहिती काढत त्यांना नंतर बांधून ठेवले होते.
advertisement
घटनेनंतर चोरट्यांनी अवघ्या २० मिनिटांत बँक लुटली आणि ते पसार झाले होते. या दरम्यान एका ग्राहकाने बँकेत जाऊन पाहिले असता काही कर्मचाऱ्यांचे हात बांधलेले होते आणि तोंड देखील बांधलेले होते. त्यानंतर बॅक कर्मचाऱ्यांची सुटका झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली.
advertisement

चडचण दरोड्याचे मंगळवेढा कनेक्शन, पत्र्याच्या घरावर बॅग सापडली

दरोड्यात वापरण्यात आलेली मारुती कार ही मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथून 8 सप्टेंबर रोजी चोरीला गेल्याचे उघड झाले होते. हीच कार दरोडा घालून पळताना हुलजंती येथे अपघातग्रस्त अवस्थेत पोलिसांच्या हाती लागली. त्यातून रोकड आणि सोन्याचे काही दागिने मिळाले. यानंतर केवळ दोन दिवसांत हुलजंती येथील जुन्या घराच्या पत्र्यावर ठेवलेली बॅग पोलिसांना सापडली. त्यामध्ये साडेसहा किलो सोने आणि तब्बल ४१ लाख ४ हजार रुपये रोख रक्कम मिळाल्याचे कर्नाटक पोलिसांनी सांगितले.
advertisement

कारच्या विक्रीचा गुंता, पोलिसांची डोकेदुखी

या धाडसी दरोड्यात जवळपास २१ कोटी रुपयाचा ऐवज लंपास केला होता. या गुन्ह्यात वापरलेली मारुती कार मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावातून चोरण्यात आल्याचे समोर आले होते. ही कार मंगळवेढ्यातून आठ सप्टेंबर रोजी चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरोड्यात ही कार वापरण्यापूर्वी चोरट्यांनी कारची नंबर प्लेट बदलली होती. ही कार मूळ साताऱ्याच्या मालकाची असून त्याने कोल्हापूरच्या एजंटमार्फत मंगळवेढ्यातील आंधळगाव येथे त्याची विक्री केली होती. मात्र, ही विक्री केवळ करार करून केल्याने अजून कागदपत्रे आंधळगावच्या मालकाच्या नावावर झाली नव्हती. दरम्यान आठ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळेला आंधळगाव येथून या मालकाच्या घरासमोरून ही गाडी चोरीला गेली होती. पोलीस आता या कार चोरांची सीसीटीव्ही फुटेज शोधू लागले असून ते मिळाल्यास चडचण दरोडा प्रकरणात मोठा खुलासा होऊ शकेल.
advertisement
या संपूर्ण घटनेतून मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव आणि हुलजंती या दोन गावांचा दरोड्याशी थेट संबंध जोडला जात असून आता या प्रकरणामागे राजकीय सूत्रधार असल्याची चर्चा रंगली आहे. सध्या कर्नाटक, मंगळवेढा, सोलापूर आणि उमदी येथे पोलिसांच्या पथकांकडून नऊ संशयितांची चौकशी सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे या दरोड्याचा मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
advertisement

चडचण दरोड्यात मंगळवेढ्याचे नवे कनेक्शन

चडचण येथे दरोड्यात वापरण्यात आलेली कार मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथून चोरीला जाणे यानंतर दरोडा टाकून पळून जाताना ही कार मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे सापडणे आणि दरोड्यातील काही किमती मुद्देमाल असणारी बॅग देखील हुलजंती येथे सापडणे यावरून आता चढचण दरोड्यात मंगळवेढाचे नवीन कनेक्शन समोर आल आहे हे मात्र नक्की. चडचण पोलिसांना मिळालेल्या बॅगेत आणि कारमध्ये एकूण ६.५ किलो सोने आणि ४१.५ लाख रुपये असल्याची माहिती आहे. या तपासासाठी मंगळवेढा सोलापूर आणि उमदी या तीन ठिकाणी पोलिसांच्या टीम काम करीत असून सध्या जवळपास नऊ संशयितांची चौकशी केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. या दरोड्यामागे सूत्रधार राजकीय असल्याची ही नवीन चर्चा सुरू झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
State Bank Of India दरोडा: २० किलो सोने, दीड कोटी रुपये लंपास, पत्र्याच्या घरावर बॅग सापडली, दरोड्याचं सोलापूर कनेक्शन
Next Article
advertisement
Mumbai Mayor Reservation: अ, आ, इ, ई... आणि मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी प्रवर्ग बाहेर पडण्याचं खरं कारण
अ, आ, इ, ई... अन् मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी बाहेर का?
  • मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

  • महापौर आरक्षण सोडतीवर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता.

  • ओबीसींसाठी मुंबईचं महापौर पदाचं आरक्षण का लागू झालं नाही, असा प्रश्न उपस्थित करण

View All
advertisement