भाषण सुरू असताना कार्यकर्ता ओरडला, राहुल पाटलांना आमदार करा, अजित पवार म्हणाले, जे तुझ्या मनात तेच...

Last Updated:

Rahul Patil Join NCP Ajit Pawar: अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरात कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगदी तोंडावर पी एन पाटील यांचे राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

अजित पवार-राहुल पाटील
अजित पवार-राहुल पाटील
कोल्हापूर : कोल्हापुरातील कार्यकर्ता मेळाव्यात दिवंगत नेते पी एन पाटील यांचे राहुल पाटील यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पी एन पाटील आणि विलासराव देशमुख यांचे संबंध सांगत असताना, लातूर आणि सडोली खालसा एक समीकरण होते, आता यापुढे सडोली खालसा आणि काटेवाडी यांच्यातील नातं कसे असेल हे संपूर्ण महाराष्ट्र बघेल, अशा शब्दात अजित पवार यांनी पाटील कुटुंबाला आश्वस्त केले.
अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरात कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगदी तोंडावर पी एन पाटील यांचे राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पाटील कुटुंबियांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला फायदा होईल, असे अजित पवार म्हणाले.

राहुल पाटलांना आमदार करा, अजित पवार म्हणाले, जे तुझ्या मनात तेच माझ्या मनात

advertisement
अजित पवार म्हणाले, पी एन पाटील साहेब आपल्या सगळ्यांना अचानक सोडून जातील असे वाटले नव्हते. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की राहुल भैया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून चूक केली असे कपादि वाटू देणार नाही. राज्याच्या विकासासाठी शेतकरी, तरुण-तरुणी मागे राहू नये यासाठी आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार न सोडता सत्तेत सहभागी झालो आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात सर्वात आधी बेरजेचे राजकारण सुरू केले. सर्वधर्मसमभाव विचार घेऊन चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आश्वासक चेहरा म्हणून तुम्ही राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्याकडे पाहता. तुमच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खूप मोठा फायदा होणार आहे. काळजी करू नका, तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे ते येणाऱ्या काळात पूर्ण करू, असे सूचकपणे अजित पवार म्हणाले.
advertisement

होय रे बाबा... आता स्टॅम्पवर लिहून देऊ का?

आपण सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाला आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पक्षाला बाधा पोहचेल असे वागता कामा नये. गेल्या वेळी जरा कमी पडला, नाहीतर ते आमदार झालेच असते, असे अजित पवार म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांमधून राहुलदादा पाटील यांना आमदार करा, अशी आरोळी एकाने ठोकली. त्यावर, होय रे बाबा... आता स्टॅम्पवर लिहून देऊ का? तू माझी लिंक तोडू नको, माझी लिंक तुटली तर तुझं काय खरं नाही, असे अजितदादा मिश्किलपणे म्हणाले.
advertisement

जिल्हा परिषद झाली, आता विधिमंडळ बाकी आहे

जिल्हा परिषद झाली, आता विधिमंडळ बाकी आहे. हे कार्यकर्ते आमची ताकद असते, कार्यकर्ते नसतील ही जनता नसेल तर आम्हाला कोण कुत्रं विचारणार नाही. मी कुठेही मागे पडणार नाही, तुम्ही देखील जीवात जीव असेपर्यंत राहुल पाटील यांना साथ द्या. कोणतरी कान भरतील, कोण तरी काड्या घालण्याचे काम करतील पण कुणाचं काही ऐकू नका, असेही अजित पवार कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाषण सुरू असताना कार्यकर्ता ओरडला, राहुल पाटलांना आमदार करा, अजित पवार म्हणाले, जे तुझ्या मनात तेच...
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement