Kolhapur News : विवेकानंद कॉलेजमध्ये एमबीए, एमसीए विद्याशाखांचे उद्घाटन; अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती, स्कॉलरशिपही दिली जाणार

Last Updated:

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने एक स्कॉलरशिप आहे. याद्वारे सीईटीमध्ये जो विद्यार्थी 85 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के फी माफ होणार आहे.

+
कार्यक्रमात

कार्यक्रमात बोलताना सयाजी शिंदे

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही एक नामांकित संस्था आहे. या संस्थेच्या विवेकानंद महाविद्यालयात आता एमबीए आणि एमसीए या दोन नवीन विद्याशाखा सुरू होत आहेत. या विद्याशाखांचे उद्घाटन नुकतेच प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
advertisement
उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी ऋषी डोंगरे आणि प्राध्यापक सतीश उपळावीकर यांनी रेखाटलेली रेखाचित्रे सयाजी शिंदे यांना भेट म्हणून देण्यात आली. यावेळी हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी कष्ट घेतलेल्या प्राचार्य विरेन भिर्डी, आर. के. पाटील, विराज जाधव, अमित आव्हाड, विजय पुजारी, अश्विनी. चौगुले, सर्जेराव खोत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
advertisement
झाड मुलांच्या मनात लावले पाहिजे - सयाजी शिंदे
आजकाल विकासाच्या नावाखाली पर्यावरणाच्या ऱ्हासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लाखो विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची चळवळ हाती घ्यावी. झाड मुलांच्या मनात लावले पाहिजे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. तर महाविद्यालयातील ग्रंथ आणि शिक्षक यांच्यामुळे अभिनयाची ओढ मला लागली, असे मत यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
advertisement
या विद्याशाखा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि रोजगारभिमुख बनविण्यासाठी एमबीए आणि एमसीए अशा अभ्यासक्रमांची आवश्यकता असून या अभ्यासक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे मनोगत त्यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
1 ऑगस्टपासून करता येणार पीक पेऱ्याची नोंदणी, शेवटची तारीख अन् संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी?, मोबाईलवरच भरता येणार माहिती..
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी केले. पाहुण्यांची ओळख संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी करून दिली. आभार एमबीएचे विभागप्रमुख प्रा. विराज जाधव यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील, प्रा. समीक्षा फराकटे, प्रा. अशोक पाटील यांनी केले.
advertisement
असा होणार विद्यार्थ्यांना फायदा -
ऑल इंडिया काऊन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन या शिखर संस्थेच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने 2024-25 पासून एमबीए आणि एमसीए हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. जे विद्यार्थी सीईटीच्या माध्यमातून इथे येतील, त्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकतो. तर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी दोन स्कॉलरशिपही देण्यात येणार आहेत.
advertisement
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने एक स्कॉलरशिप आहे. याद्वारे सीईटीमध्ये जो विद्यार्थी 85 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के फी माफ होणार आहे. दुसऱ्या एका 65 ते 85 टक्के या दरम्यान सीईटीमध्ये कोण मिळवले असतील, तर अशा विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांच्या नावाने स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यामध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त स्कॉलरशिपची रक्कम दिली जाणार आहे. तसेच विवेकानंद महाविद्यालयातून पास होऊन जो विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेईल, त्याला अधिकची पंधरा हजार रुपयांची स्कॉलरशिपही महाविद्यालयाच्या मार्फत देण्यात येणार आहे, अशी माहिती विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी दिली आहे.
advertisement
दरम्यान, या उद्घाटन कार्यक्रमाला संस्था संकुलातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर शेवटी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह विद्यार्थ्यांना आवरता आला नाही.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur News : विवेकानंद कॉलेजमध्ये एमबीए, एमसीए विद्याशाखांचे उद्घाटन; अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती, स्कॉलरशिपही दिली जाणार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement