भक्तांनो, लक्ष द्या! आज आणि उद्या श्री अंबाबाईचं दर्शन बंद, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया सुरू करण्यासाठी नवी दिल्लीतून तज्ज्ञ पथक दाखल झाले आहे. त्यामुळे 11 आणि 12 ऑगस्ट या दोन दिवसांसाठी...
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया करण्यासाठी नवी दिल्ली येथील केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. या महत्त्वपूर्ण कामामुळे सोमवार, 11 ऑगस्ट आणि मंगळवार, 12 ऑगस्ट हे दोन दिवस भाविकांसाठी देवीचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
उत्सवमूर्ती आणि कलशाचे दर्शन पेटी चौकात
संवर्धन प्रक्रियेमुळे अंबाबाईची मुख्य मूर्ती दर्शनासाठी उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत उत्सवमूर्ती आणि कलश मुख्य गर्भगृहाबाहेर पेटी चौकात ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून भाविकांना दर्शन घेता येईल.
संवर्धन प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी सकाळी दहा वाजेपर्यंत सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यात येणार आहेत. श्रीपूजक माधव मुनिश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 8:30 वाजता मूर्तीवर अभिषेक आणि आरती होईल. त्यानंतर धार्मिक विधींद्वारे देवीचा कलश आणि उत्सवमूर्ती गर्भगृहाबाहेर नेण्यात येईल. बुधवार, 13 ऑगस्ट रोजी पुन्हा देवीतत्त्व कलशाचे धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे.
advertisement
मूर्ती संवर्धनाचे स्वरूप
या संवर्धन प्रक्रियेमध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे तज्ज्ञ खालीलप्रमाणे काम करतील
- मूर्तीची सध्याची स्थिती तपासली जाईल.
- 2015 साली झालेल्या संवर्धन प्रक्रियेचा आढावा घेतला जाईल.
- मूर्तीवर झालेली नैसर्गिक झीज, धूळ आणि हवामानामुळे झालेले परिणाम तपासले जातील.
- मूर्तीच्या दीर्घकाळासाठी जतनासाठी आवश्यक रासायनिक उपाययोजना केल्या जातील.
हे ही वाचा : कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 'मिशन मोड'वर काम! 60 हजार खटले वर्ग होणार, 700 वकिलांना मिळणार संधी!
advertisement
हे ही वाचा : विजयदुर्ग किल्ल्याचा 'हा' बुरूज ढासळला; समुद्री लाटांच्या माऱ्यामुळे होतीय पडझड! कोण देणार लक्ष?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 11, 2025 8:48 AM IST
मराठी बातम्या/कोल्हापूर/
भक्तांनो, लक्ष द्या! आज आणि उद्या श्री अंबाबाईचं दर्शन बंद, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन