Health Tips : रोज थोडा आल्याचा रस प्या अन् हृदयरोगासह अनेक आजारांना ठेवा दूर, भन्नाट आहेत फायदे
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
आल्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि ए, बी1, बी2, सी अशी जीवनसत्त्वे असतात. तर आले हे अँटी ऑक्सिडेंट, अँटी इंफ्लेमेटरी आणि अँट कॅन्सर गुणधर्मांनी युक्त असते.
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : आपल्या जेवणात इतर मसाल्याच्या घटकांबरोबरच आल्याचा वापर देखील सर्रास केला जात असतो. याच आल्याचा रस आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी ठरत असतो. आले हे अनेक पोषकतत्वांनी युक्त असून रोज आल्याचा वापर केल्यास आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. मुख्यतः हृदय रोगाशी संबंधित, पोट विकार, रक्ताभिसरण, चयापचय आणि त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आल्याचा किंवा आल्याच्या रसाचा फायदा होतो. त्यामुळेच नेमक्या कोणकोणत्या समस्यांवर आले उपयोगी ठरू शकते, आल्याचा रस रोज पिल्याने नेमके काय काय फायदे होऊ शकतात, याबाबत कोल्हापुरातील आयुर्वेद तज्ञ डॉ. अनिलकुमार वैद्य यांनी महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
आल्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि ए, बी1, बी2, सी अशी जीवनसत्त्वे असतात. तर आले हे अँटी ऑक्सिडेंट, अँटी इंफ्लेमेटरी आणि अँट कॅन्सर गुणधर्मांनी युक्त असते. आल्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्स असतात. म्हणूनच दररोज आल्याचा समावेश आपल्या जेवणात करणे योग्य ठरते, असे मत डॉ. अनिलकुमार वैद्य यांनी व्यक्त केले. आल्याचा सेवनाचा काय फायदा होतो, याबाबतही त्यांनी माहिती दिली.
advertisement
आल्याच्या सेवनाचा फायदा -
- आयुर्वेदात हृदयरोगावर सांगण्यात आलेल्या अनेक द्रव्यांमध्ये आल्याचा रस हा इतर घटकांपेक्षा सर्वोत्तम आहे.
- आले हे अनेक आजारांवर उपाय म्हणून वापरले जाते. अगदी संधिवातापासून ते अगदी सर्दी, खोकला अशा अनेक आजारांवर आल्याचा वापर केला जातो.
- कुणाला जर दम्याचा त्रास असेल तर सर्वात सोपा घरगुती उपाय म्हणजे आल्याची पेस्ट करून पाण्यामध्ये टाकावी आणि त्याची वाफ घ्यावी. लगेच दम्याच्या त्रासापासून किंवा खोकल्यापासून आराम मिळतो.
- आल्याचा उपयोग त्वचारोगावरही केला जातो. तसेच त्याचा उपयोग ससौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो.
- आल्याचे तेल हे अतिशय उत्तम असते. आल्याचे तेल, खोबरेल तेल आणि तिळाचे एकत्र मिश्रण करून केसांना लावल्यास त्याचा उपयोग केस वाढीसाठी होतो. या उपयांमुळे केसांमधील पांढरेपणा कमी होण्यासही मदत होते.
- पोटाच्या आजारामध्ये विशेषतः पोट दुखत असल्यास, आल्याचा रस लिंबाच्या रसाबरोबर घेतल्यास पोटदुखी कमी होण्यास मदत होते. तर यामध्ये ओवा पण टाकला तर अतिशय चांगला फरक पडतो.
- चहा बनवताना बराच वेळा आले टाकून बनवला जातो. तो देखील शरीरासाठी अतिशय उपयुक्त परिणाम करत असतो.
- विशेषतः संधिगत रोगांवर, सांध्याच्या रोगांवर, सांध्याचे आजार टाळण्यासाठी आल्याचा उपयोग केला जातो.
- मासिक पाळीतील विकारामुळे स्त्रियांमध्ये पाळीच्या वेळी पोटामध्ये जास्त दुखत असेल, तर अशावेळी 2-3 चमचे आल्याचा रस घेतल्यास निश्चित त्याचा चांगला उपयोग होतो.
- विविध जंतूसंसर्गजन्य रोग किंवा विषाणूजन्य आजारांच्या विरोधात लढण्यासाठीचे गुणधर्म आल्यामध्ये असल्यामुळे तापामध्येही आल्याचा वापर होतो.
advertisement
म्हाडाच्या घरासाठी कोणती कागदपत्रे लागतात, आधीच्या तुलनेत प्रक्रिया झाली सोपी, असा करा कर्ज…
दरम्यान, अशाप्रकारे आल्याचे अनेक उपयोग आहेत. तर आल्याच्या झाडाच्या पानांचे तसेच आल्याच्या सालीचेदेखील आरोग्यासाठी गुणकारी उपयोग आहेत. त्यामुळे आले कोणत्याही स्वरूपात घेतल्यास शरीराला नक्कीच त्याचा फायदाच होत असतो, असेही वैद्य यांनी स्पष्ट केले आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
August 02, 2024 7:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Health Tips : रोज थोडा आल्याचा रस प्या अन् हृदयरोगासह अनेक आजारांना ठेवा दूर, भन्नाट आहेत फायदे