भावाला राखी बांधून हॉस्टेलवर आली अन् एका फोननंतर संपवलं आयुष्य, हॉस्टेलच्या रुम नंबर 54 मध्ये काय घडलं? शिवाजी विद्यापीठात खळबळ
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Kolhapur Shivaji University Hostel Girl : वडिलांना सांगितलं सुखरुप पोहोचले अन् गायत्रीने अखेरचा निरोप दिला. रुममध्ये कुणी नसताना आतून कडी लावून घेतली आणि गळफास लावून घेतला.
Kolhapur Crime News : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या शिवाजी विद्यापाठीत धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजी विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये एका तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गायत्री पंढरीनाथ रेळेकर असं तरुणीचं नाव असून ती फक्त 21 वर्षांची होती. नैराश्यातून गायत्रीने टोकाचं पाऊल उचललं, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सध्या खळबळ उडाली असून वसतिगृहात भीतीचं वातावरण आहे.
हॉस्टेल रुम नंबर 54
राजारामपुरी पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. पण गायत्रीने टोकाचं पाऊल का उचललं? असा सवाल विचारला जात आहे. गायत्री हॉस्टेलच्या रुम नंबर 54 मध्ये राहत होती. तिथं तिच्या दोन मौत्रिणी देखील राहत होत्या. रक्षाबंधनानिमित्त गायत्री 8 ऑगस्टला गावाला गेली होती. त्यानंतर सोमवारी ती हॉस्टेलवर परत आली. हॉस्टेलवर आल्यानंतर तिने बॅग ठेवली अन् वडिलांना फोन केला.
advertisement
वडिलांना फोन केला अन् संपवलं आयुष्य
वडिलांना सांगितलं सुखरुप पोहोचले अन् अखेरचा निरोप दिला. रुममध्ये कुणी नसताना आतून कडी लावून घेतली आणि गळफास लावून घेतला. दुपारी दोनच्या सुमारास जेव्हा गायत्रीची रुममेट परत आली, तेव्हा तिने दरवाजा वाजवला पण गायत्रीने दरवाजा उघडला नाही. मैत्रिण दरवाजा उघडत नसल्याचं लक्षात येताच तिने खिडकीतून आत डोकावलं. तेव्हा तिला धक्काच बसला. गायत्री पंख्याला लटकलेली दिसल्यावर तिने सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलवलं.
advertisement
पोलिसांचा सखोल तपास
दरम्यान, वसतिगृह अधीक्षकांनी दरवाजा तोडला अन् तातडीने पोलिसांना बोलवलं. लगेच राजारामपुरी पोलिसांना माहिती देण्यात आली. प्रभारी पोलिस निरीक्षक सागर आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
August 12, 2025 9:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
भावाला राखी बांधून हॉस्टेलवर आली अन् एका फोननंतर संपवलं आयुष्य, हॉस्टेलच्या रुम नंबर 54 मध्ये काय घडलं? शिवाजी विद्यापीठात खळबळ