Rohit Pawar: शरद पवारांच्या सभेआधी रोहित पवारांची कोल्हापुरात 'बॅटिंग', हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
कोल्हापुरातील सभेबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, स्वाभिमानी सभा उद्या २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. ही सभा सप्टेंबरमध्ये घेण्याची विनंती पवार साहेबांना केली होती, पण त्यांनी ऐकलं नाही.
ज्ञानेश्वर साळुंखे, कोल्हापूर, 24 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर दौरा करणार आहेत. त्याआधी आमदार रोहित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी अजित पवार गटात गेलेले नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला. 1998 मध्ये हसन मुश्रीफ यांना संधी देवू नये असा काहींचा आग्रह होता, पण शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना संधी दिली असं रोहित पवार म्हणाले.
मुश्रीफांना संधी देऊ नये असं अनेक जण म्हणत असतानाही शरद पवार यांनी कार्यकर्ता माझा आहे असं म्हणत संधी दिली. नेत्यांमुळे ताकद होती असे नाही. कार्यकर्ते सुद्धा महत्वाचे आहेत. अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. आता निष्ठावंत कार्यकर्ते सांगत आहेत की पूर्वी पेक्षा जास्त ताकदीने लढू असेही यावेळी रोहित पवार यांनी सांगितले.
advertisement
कोल्हापुरातील सभेबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, स्वाभिमानी सभा उद्या २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. ही सभा सप्टेंबरमध्ये घेण्याची विनंती पवार साहेबांना केली होती, पण त्यांनी ऐकलं नाही. शरद पवार यांनी अत्यंत पवित्र आणि विचार असणाऱ्या दसरा चौक इथेच सभा व्हावी अशी इच्छा होती अशी माहितीसुद्धा रोहित पवार यांनी दिली.
advertisement
राष्ट्रवादीची पहिली बैठक कोल्हापुरात होणार आहे. यासाठी जे ठिकाण निवडले आहे, त्या ठिकाणाहुन एक वेगळा विचार पवार साहेब देतील. कोण काय उल्लेख करत याकडे आपण किती लक्ष द्यायचे हे ठरवायला पाहिजे. भाजपला स्वतःच्या कार्यकर्त्यावर विश्वास राहिला नाही, म्हणून ते इतरांचे पक्ष आणि कार्यकर्ते फोडत आहे. सांगलीचे लोकल नेते सांगलीची समीकरण बघून काही वक्तव्य करत आहेत. जयंत पाटील हे पहिल्या पासून शरद पवार यांच्या सोबत आणि यापुढे देखील पवार यांच्या सोबतच राहतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
advertisement
दरम्यान, अजित पवार यांचीही सभा होणार असून त्या सभेच्या स्टेजवरील बॅनरवर शरद पवार यांचा फोटो नसल्याने चर्चा रंगलीय. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, पवार साहेबांचा फोटो लावून संभ्रम निर्माण करत आहेत. अजित पवार यांची पहिली सभा होत आहे, त्यात पवार साहेब याचा फोटो लावणार नाहीत अस कळतंय. आता त्या सभेत ते काय बोलतात ते पाहू.
advertisement
कोल्हापुरात दंगलीचं वातावरण मधल्या काळात तयार झालं होतं. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, कोल्हापुरात दंगलीचा विचित्र प्रयोग होत होता. दंगली दरम्यान पोर बाहेरून आणली, कोणी आणली हे माहिती नाही. किमान एक दिवस आधी दंगल होईल असं पोलिसांना वाटलं होतं, मग ते रोखलं नाही असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला. दंगल रोखण्यासाठी राज्य पातळीवरील नेत्यांचा आदेश आला नसेल म्हणून दंगल रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला नाही असा आरोपही त्यांनी केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 24, 2023 12:10 PM IST
मराठी बातम्या/कोल्हापूर/
Rohit Pawar: शरद पवारांच्या सभेआधी रोहित पवारांची कोल्हापुरात 'बॅटिंग', हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल