कोल्हापूरची चिंता वाढली! महापुराची भीती दूर झाली, पण पुन्हा पावसाची ओढ वाढली; कारण...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कोल्हापूर जिल्ह्यात मे आणि जूनमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे महापुराची भीती होती, पण जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने आता...
कोल्हापूर : जिल्ह्यात मे आणि जून महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला, त्यामुळे महापुराची भीती निर्माण झाली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने आता यंदा सरासरी गाठतो की नाही, अशी चिंता निर्माण झाली आहे. 12 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ 62.94 टक्केच पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही 27.62 टक्के पावसाची तूट आहे.
जुलै-ऑगस्टमध्ये पावसाची पाठ फिरवली
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस चांगलाच झाला होता. मे महिन्यात तब्बल 241 मिमी पाऊस झाल्यामुळे धरणांतील पाणीसाठा समाधानकारक झाला होता. जून महिन्यातही पावसाचा जोर कायम राहिला, ज्यामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आणि पंचगंगेनेही धोक्याची पातळी ओलांडली. जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, पण त्यानंतर मात्र पावसाने पाठ फिरवली. गेल्या 15 दिवसांपासून पाऊस गायब झाला असून, अधूनमधून येणारी एखादी छोटी सर वगळता सर्वत्र कोरडे वातावरण आहे.
advertisement
महापुराचा महिना ठरला कोरडा
15 जुलै ते 15 ऑगस्ट हा कालावधी जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचा मानला जातो. 2019 आणि 2021 साली याच काळात मोठा पाऊस होऊन महापूर आला होता. मात्र, यावर्षी याच कालावधीत मोठा पाऊस झाला नाही. जिल्ह्यात 1 ते 12 ऑगस्ट या कालावधीत सरासरी 188.1 मिमी पाऊस पडतो, पण यावर्षी याच काळात केवळ 35.5 मिमी पाऊस झाला आहे. हे प्रमाण सरासरीच्या केवळ 18.08 टक्के इतके कमी आहे.
advertisement
गेल्या वर्षीच्या तुलनेत 28% कमी पाऊस
1 जून ते 12 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सरासरी 1236.5 मिमी पाऊस पडतो. गेल्या वर्षी याच काळात 1119.8 मिमी, म्हणजेच सरासरीच्या 90.56 टक्के पाऊस झाला होता. यावर्षी मात्र याच काळात केवळ 778.03 मिमी म्हणजेच सरासरीच्या 62.94 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 28 टक्के कमी पाऊस झाला आहे. या पावसाच्या ओढीमुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची भविष्यातील चिंता वाढली आहे.
advertisement
हे ही वाचा : Marathwada Rain: मराठवाड्यात वारं फिरलं, 7 जिल्ह्यांत धो धो कोसळणार, 72 तासांसाठी अलर्ट
हे ही वाचा : सांगलीत 'लेक लाडकी' योजना हिट! 3000 हून जास्त मुलींना मिळाले पैसे; कसा आणि कुठे कराल अर्ज?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 13, 2025 8:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरची चिंता वाढली! महापुराची भीती दूर झाली, पण पुन्हा पावसाची ओढ वाढली; कारण...