कोल्हापूरात पावसाची उघडीप पण धरण क्षेत्रात मुसळधार, पुराची पाणी पातळी किती वाढली? पूर परिस्थितीची अपडेट...
- Published by:News18 Marathi
- local18
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
धोका पातळीवरून वाहत असलेल्या पंचगंगा नदीचे पाणी सध्या शहरी परिसरातही बऱ्याच सखल भागांमध्ये घुसले आहे. राजाराम बंधारा या ठिकाणी पंचगंगेची पाणीपातळी 27 जुलै दुपारी 1 वाजता 47 फूट 5 इंच इतकी नोंदवण्यात आली आहे.
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : सध्या पंचगंगेचे पाणी पातळी ही सत्तेचाळीस फुटावर गेली आहे. त्यामुळे कोल्हापुरात शहरांमध्ये सखल भागात पाणी साचायला सुरुवात देखील झाले आहे. पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आंबेवाडी आणि चिखली ही कोल्हापुरातील गावे सर्वाधिक पूर बाधित असणारी आहेत. या ठिकाणी सध्या पुराचे पाणी गावात शिरले आहे. गावातील जवळपास सर्वच लोकांचे स्थलांतर झाले आहे. जिल्हाभरात तब्बल 5 हजार 845 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
advertisement
कोल्हापूर, रत्नागिरी महामार्गावर सध्या पूर्णपणे पाणी आले आहे. हा मार्ग छत्रपती शिवाजी पुलाजवळ लावून बंद करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील चित्रही अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 24 राज्यमार्ग तसेच 123 प्रमुख जिल्हामार्ग, असे एकूण 147 मार्ग बंद करण्यात आले आहेत. तर जिल्हा परिषदेकडील 17 जिल्हामार्ग आणि 30 ग्रामीण मार्ग, असे एकूण 47 मार्ग बंद करण्यात आले आहे.
advertisement
या सर्वच मार्गांवरील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. दरम्यान, रस्त्यावर पाणी आले असताना नागरिकांनी धोकादायक पद्धतीने पाण्यातून गाडी घालून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील स्थलांतरितांची तालुकास्तरीय आकडेवारी -
कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल 5845 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा निवारा केंद्रांमध्ये हे नागरिक सुरक्षित आहेत. यामध्ये करवीर तालुक्यातील 1199 कुटुंबातील 5098 जण, पन्हाळा तालुक्यातील 8 कुटुंबातील 40 जण, शाहूवाडी तालुक्यातील 7 कुटुंबातील 21 जण, कागल तालुक्यातील 21 कुटुंबातील 69 जण, हातकणंगले तालुक्यातील 35 कुटुंबातील 181 जण, भुदरगड तालुक्यातील 3 कुटुंबातील 9 जण, गडहिंग्लज तालुक्यातील 1 कुटुंबातील 7 जण, चंदगड तालुक्यातील 2 कुटुंबातील 7 जण, इचलकरंजी महानगरपालिका परिसरातील 34 कुटुंबातील 140 जण, इचलकरंजी अप्पर तहसील कार्यालय परिसरातील 33 कुटुंबातील 170 जण, कोल्हापूर महापालिका परिसरातील 24 कुटुंबातील 103 जणांचा समावेश आहे.
advertisement
काय आहे पंचगंगेची सध्याची परिस्थिती?
धोका पातळीवरून वाहत असलेल्या पंचगंगा नदीचे पाणी सध्या शहरी परिसरातही बऱ्याच सखल भागांमध्ये घुसले आहे. राजाराम बंधारा या ठिकाणी पंचगंगेची पाणीपातळी 27 जुलै दुपारी 1 वाजता 47 फूट 5 इंच इतकी नोंदवण्यात आली आहे. तर 43 फूट ही पंचगंगेची धोका पातळी आहे. दुसरीकडे राधानगरी धरणाच्या नंबरच्या एकूण 4 स्वयंचलित दरवाजांमधून भोगावती नदी पात्रात विसर्ग सुरू असल्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी पातळी इंच-इंचाने वाढत आहे.
advertisement
एनडीआरएफ सतर्क -
15 जून 2024 रोजीपासून निरीक्षक ब्रिजेश गायकवाड आणि 30 लोकांसह एनडीआरएफच्या एका पथकाने संपूर्ण चिखली, आंबेवाडी गाव परिसरात कोणत्या समस्या उद्भवू शकतात, याचे सर्वेक्षण केले आहे. पुराच्या काळात काय केले पाहिजे, काय करू नये, या सर्व गोष्टींबद्दल तसेच कोणत्या इम्प्रोव्हाईज्ड फ्लोटिंग उपकरणांची मदत कशी घेऊ शकतो, याबद्दल लोकांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेतले आहेत.
advertisement
सध्याची कोल्हापुरातील परिस्थिती पाहता, जिथे धोका संभवतो, अशा ठिकाणी बचावकार्य केले जात आहे. शासन प्रशासन सर्वतोपरी नागरिकांची मदत करत आहे. लोकांना घरीच राहा, नीट राहा आणि आवश्यक असल्यास सरकारची मदत घ्या तसेच सरकारलाही मदत करा, असे आवाहन केले जात आहे. अशाप्रकारे आम्ही काम करत आहोत आणि आमची दुसरी टीम देखील आता तिथे आहे. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या टीम्स बनवल्या आहेत, एक टीम जयंती नाल्याजवळ आहे, एक राजाराम बंधाऱ्याजवळ आहे, अशाप्रकारे आम्ही टीम्स बनवल्या आहेत आणि सर्वत्र जिल्हाभरात सतर्क आहोत, असे एनडीआरएफचे सहाय्यक कमांडर चंद्रकेतू शर्मा यांनी सांगितले आहे.
advertisement
दरम्यान, सध्या कोल्हापुरात पावसाने उघडीप दिलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूरकर पूर पाहायला बाहेर पडत आहेत. मात्र, सध्याची पूर परिस्थिती पाऊस वाढल्यास अजून गंभीर बनण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
July 27, 2024 4:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरात पावसाची उघडीप पण धरण क्षेत्रात मुसळधार, पुराची पाणी पातळी किती वाढली? पूर परिस्थितीची अपडेट...