कोल्हापूरला दिलासा! पंचगंगा 29 फुटांनी खाली, पण 38 बंधारे अजूनही पाण्याखाली!

Last Updated:

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी पावसाने उघडीप दिली असली तरी, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी आणि आजरा या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे राधानगरी...

Kolhapur rain update
Kolhapur rain update
कोल्हापूर : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर पावसाची उघडीप असली, तरी काही तालुक्यांमध्ये पावसाने चांगलाच जोर धरला होता. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी आणि आजरा या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. यामध्ये गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. राधानगरी धरण 99 टक्के, तर तुळशी धरण 92 टक्के भरले आहे. दुसरीकडे पंचगंगा नदीची पाणी पातळी हळूहळू खाली येत आहे.
पंचगंगा पाणी पातळी 29 फूटाने खाली
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये मात्र पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. नद्यांमधील पाण्याची पातळी कमी होत असून, पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फुटांपर्यंत खाली आली आहे. असे असले तरी, जिल्ह्यातील 38 बंधारे अजूनही पाण्याखाली असल्याने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत आहे. पाऊस कमी झाला असला तरी, धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला असल्याने धरणातून सध्या 1428 क्यूसेक आणि पॉवर हाऊसमधून 1500 क्यूसेक, असा एकूण 2928 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय, वारणा धरणातून 11960 क्यूसेक तर दूधगंगा धरणातून 6100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
advertisement
पावसाच्या उघडीपमुळे नागरिकांची वर्दळ
बुधवारी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र, गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल, आणि गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ वाढली होती. सायंकाळनंतर मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.
advertisement
5 राज्य, 9 जिल्हा मार्ग अजूनही बंद
पावसामुळे जिल्ह्यातील वाहतुकीवर अजूनही परिणाम दिसून येत आहे. 5 राज्य मार्ग आणि 9 प्रमुख जिल्हा मार्ग अद्यापही बंद आहेत. यामध्ये शिरढोण-कुरुंदवाड मार्गावरील शिरढोण पूल पाण्याखाली असल्याने एसटी वाहतूक बंद आहे. तसेच, जमखंडी-कुडची मार्गावरील कुडची पूल पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहतूकही थांबली आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरला दिलासा! पंचगंगा 29 फुटांनी खाली, पण 38 बंधारे अजूनही पाण्याखाली!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement