कोल्हापूरकरांसाठी दिलासा! सततच्या पूरग्रस्त प्रश्नावर अखेर तोडगा; 524 कोटींचा पूरनियंत्रण प्रकल्प होणार सुरू

Last Updated:

कोल्हापूर शहराला वारंवार येणाऱ्या पुरापासून कायमस्वरूपी मुक्ती देण्यासाठी 524 कोटी रुपयांच्या पूरनियंत्रण प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या...

Kolhapur News
Kolhapur News
कोल्हापूर : पुराचा सतत सामना करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शहराला पुरापासून वाचवण्यासाठी 524 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पूरनियंत्रण प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकल्पातील कामे टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, यासाठी जागतिक बँक आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यातून निधी उपलब्ध होणार आहे.
पुराचा धडा घेऊन उचललेले पाऊल
कोल्हापूर शहराने 2005, 2019 आणि 2021 या वर्षांत आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसले आहे. दरवर्षी पावसाळ्यात पुराची भीती नागरिकांना असते. ही समस्या लक्षात घेऊन महापालिकेने तज्ज्ञ सल्लागार संस्थेमार्फत 'स्टॉर्म वॉटर ड्रेनेज मास्टर प्लॅन' आणि डीपीआर (DPR) तयार केला होता. त्यावर आधारित पूरनियंत्रणासाठीची कामे आता प्रत्यक्षात येणार आहेत.
advertisement
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
या प्रकल्पात केवळ नाल्यांचे बांधकाम नाही, तर पर्यावरणपूरक 'ब्लू-ग्रीन सोल्युशन्स'चाही समावेश करण्यात आला आहे.
  • नाल्यांचे बांधकाम : 37.16 किलोमीटर लांबीच्या नवीन नाल्यांचे बांधकाम केले जाईल.
  • जयंती नाला पुनर्रचना : जयंती नाल्याची 9.5 किलोमीटर पुनर्रचना आणि 6.62 किलोमीटर लांबीचे रस्त्याच्या कडेचे नाले बांधले जातील.
  • बॉक्स कल्व्हर्ट्स : शहरातील 137 ठिकाणी नवीन 'बॉक्स कल्व्हर्ट्स' बांधले जातील, जेणेकरून पाण्याचा प्रवाह अडकणार नाही. कल्व्हर्ट म्हणजे पाण्याच्या प्रवाहासाठी रस्त्याखालून बांधलेली बोगद्यासारखी संरचना.
  • गाळ काढणे : 10 ठिकाणचा गाळ काढला जाईल आणि 26 किलोमीटर नाल्यांची साफसफाई केली जाईल.
  • पाणी व्यवस्थापन : कळंबा तलावावर पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी 'स्लुईस गेट' बसवण्यात येईल.
advertisement
पर्यावरणाचाही विचार
या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण. नाल्यांच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार केला जाईल. शेंडा पार्क आणि शिवाजी विद्यापीठाजवळ वृक्षारोपण, तलावांची सफाई आणि हरित पट्टा निर्माण करण्यात येईल. यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल. निविदा प्रक्रियेनंतर पुढील काही महिन्यांत कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर कोल्हापूर शहराला पूरस्थितीतून कायमस्वरूपी मुक्ती मिळेल, अशी आशा आहे.
advertisement
कल्हर्ट म्हणजे काय? 
कल्हर्ट म्हणजे पाण्याच्या प्रवाहासाठी रस्त्याखालून बांधलेली टनेलसारखी संरचना. ती शहरातील पूर आणि तुंबलेल्या पाण्याचा गतीचे नियंत्रण करते. शहरात अनेक ठिकाणी जुन्या, अरुंद किंवा तुटलेल्या कल्हर्ट्समुळे पाणी साचते. अशा 137 ठिकाणी नवीन 'बॉक्स कल्हर्ट्स' बांधण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे पाणी विनाअडथळा वाहून जाईल.
advertisement
मराठी बातम्या/कोल्हापूर/
कोल्हापूरकरांसाठी दिलासा! सततच्या पूरग्रस्त प्रश्नावर अखेर तोडगा; 524 कोटींचा पूरनियंत्रण प्रकल्प होणार सुरू
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement