"लंडनमधील वाघनखं ही महाराजांची नाहीत, मग खरी कुठे?, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ

Last Updated:

विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम, लंडन यांच्याकडून इंद्रजित सावंत यांना 19 जून 2024 रोजी प्राप्त झालेल्या पत्रात वाघनखे 1971 या साली म्यूझियमकडे भेट म्हणून आल्याची माहिती आहे.

+
इतिहास

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : इंग्लंडमधील विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम, लंडन येथून आणली जाणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, असा मोठा दावा कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केला आहे. दरम्यान, असा दावा करताना त्यांनी लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअमकडून प्राप्त पत्रात याबाबतची कबूली देखील असल्याचे सांगितले आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे.
advertisement
महाराष्ट्र शासन व विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम, लंडन यांच्यामधे 3 ऑक्टोबर 2023 रोजी एक सामंजस्य करार करण्यात आला होता. विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम, लंडन येथे असणाऱ्या विविध वाघ नखांपैकी एक वाघनख 3 वर्षांकरीता भाडेतत्त्वावर भारतात आणण्याचा हा करार होता. त्यानंतर शासन आणि विविध माध्यमांकडून ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा दावा वेळोवेळी करण्यात आला. मात्र, ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, तरी देखील खोटी माहिती विविध माध्यमांतून प्रसारित केली जात आहे, असा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.
advertisement
कशावरून केला जात आहे दावा -
वाघनखांच्या संदर्भात इंद्रजित सावंत यांनी विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम यांच्याकडून माहिती मागवली होती. त्यांच्याकडून लिखित स्वरूपात सांगण्यात आले की, म्युझिअमकडे ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असण्याचा कोणताही पुरावा नाही. सदर माहिती सामंजस्य करार करताना उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधी मंडळाला स्पष्टपणे सांगण्यात आली होती, असेही इंद्रजित सावंत यांनी सांगितले आहे.
advertisement
विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम, लंडन यांच्याकडून इंद्रजित सावंत यांना 19 जून 2024 रोजी प्राप्त झालेल्या पत्रात वाघनखे 1971 या साली म्यूझियमकडे भेट म्हणून आल्याची माहिती आहे. म्यूझियमच्या संग्रहात भारतातील विविध ठिकाणांकडून आलेली एकूण 6 वाघनखे आहेत. त्यामुळे विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम यांच्याकडे असणाऱ्या वाघनखांबाबत म्युझिअमच संभ्रमावस्थेत आहे.
लंडनमधील वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचे पुरावे देखील इतिहास सशोधकांकडून विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम यांनी मान्य केले आहेत. तसेच त्यानुसार म्युझिअमकडे असणाऱ्या माहितीत बदलही केला आहे, असे सावंत सांगतात.
advertisement
महाराजांची खरी वाघनखे आहेत कुठे?
सातारा छत्रपतींना भेट देणाऱ्या अनेक उच्चपदस्थ इंग्रज व भारतीय अधिकारी यांनी छ्त्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे साताऱ्यात पाहिल्याची नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल वाघनखे साताऱ्यातून बाहेर गेल्याचा किंवा कुणाला भेट दिल्याचा कोणताही पुरावा नाही. 1907 सालच्या मॉडर्न रिव्यूच्या अंकात, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा फोटो छापला आहे. त्यामुळे जगभरातील अनेक संग्रहालयात शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या प्रतिकृती उपलब्ध आहेत, असे इंद्रजित सावंत यांनी सांगितले आहे.
advertisement
दरम्यान, जर वाघनखे महाराष्ट्रात आणली गेली, तर त्यांच्याबद्दलची ही खरी माहिती महाराष्ट्र सरकारने जिथे जिथे वाघनखे प्रदर्शित केली जातील तिथे तिथे ठळकपणे मांडावी, अशा सूचना महाराष्ट्र सरकारला आधीच म्युझियमकडून दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता याबाबत शासनाला देखील विचारपूर्वक लक्ष घालावे लागणार आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
"लंडनमधील वाघनखं ही महाराजांची नाहीत, मग खरी कुठे?, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement