Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 'शिंदे सरकार' आणखी एक गूड न्यूज देणार! योजनेबाबत मोठी अपडेट
- Published by:Shreyas
Last Updated:
महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीआधी शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेला राज्यभरातल्या महिलांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीआधी शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेला राज्यभरातल्या महिलांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 2 कोटी 40 लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. महाराष्ट्र सरकारने लाभार्थी महिलांना योजनेचे पहिले दोन हफ्तेही दिले आहेत. यानंतरही लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे अर्ज येत आहेत. या योजनेसाठीचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट होती, पण महिलांचे येत असलेले अर्ज बघता सरकार याबाबत मोठा निर्णय घ्यायचा तयारीत आहे.
महाराष्ट्रातलं महायुती सरकार महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी या योजनेचा कालावधी वाढवू शकतं. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असली तरीही अजून सरकारकडे अर्ज येत आहेत, त्यामुळे सरकार अर्ज करण्याची तारीख पुढे ढकलू शकते.
महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांशिवाय शहरी भागांमधल्या महिलांनाही अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक प्रयत्न करूनही पात्र महिला अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकत नाहीयेत. या सर्व महिलांच्या समस्या आणि त्यांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सरकार अर्ज भरण्याची तारीख वाढवण्याच्या तयारीत आहे.
advertisement
दोन हफ्त्याचे पैसे मिळाले
महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. जुलै महिन्यापासून या योजनेला सुरूवात झाली, त्यानंतर यातल्या पहिल्या दोन हफ्त्यांचे 3 हजार रुपये राखी पौर्णिमेला महिलांच्या खात्यात जमा झाले.
आधार लिंक नाही
view commentsअनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाहीये, कारण त्यांचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक नाहीये. अशा पात्र महिलांचा आकडाही जवळपास 40 ते 42 लाख रुपये आहे. आधार आणि बँक खातं लिंक झाल्यानंतर या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायला सुरूवात होईल. लाडकी बहीण योजनेसाठी 21 वर्ष ते 65 वर्ष वय असलेल्या महिला अर्ज करू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2024 7:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 'शिंदे सरकार' आणखी एक गूड न्यूज देणार! योजनेबाबत मोठी अपडेट


