Ladki Bahin : भांडणानंतर घर सोडून गेली पत्नी, नवऱ्याने 'दुसरी'ला नेऊन काढले लाडक्या बहिणीचे पैसे!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे जमा झाल्यानंतर एका पतीने दुसऱ्या महिलेला सोबत घेऊन बँकेतले पैसे काढल्याचा आरोप होत आहे.
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे जमा झाल्यानंतर एका पतीने दुसऱ्या महिलेला सोबत घेऊन बँकेतले पैसे काढल्याचा आरोप होत आहे. माझ्या खात्यातून दोन हफ्त्यांमध्ये आलेले लाडकी बहीण योजनेचे अंदाजे 5,800 रुपये काढले गेल्याचा आरोप महिलेने केला आहे. संतप्त पत्नीने तिचा पती आणि बँक अधिकाऱ्याविरोधात खटला चालवण्याची मागणी करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील राजगड येथील नेहा विशाल चव्हाण ही विवाहित महिला तिच्या पतीशी झालेल्या वादामुळे एक वर्षापासून अकोला जिल्ह्यातील राजनखेडा येथे राहत होती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असल्याने तिला महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ मिळत होता. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी महिलेने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या डोणगाव शाखेमध्ये बचत खाते उघडले. या खात्यामध्येच लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत होते.
advertisement
महिलेचा पती विशाल चव्हाण हा दुसऱ्या महिलेला बँकेत घेऊन गेला आणि त्याने बनावट सही करून पत्नीच्या खात्यातून 2800 रुपये काढले. यानंतर अशाच प्रकारे त्याने दुसऱ्यांदा 3 हजार रुपये काढले. बँक कर्मचाऱ्यांनी दोन्ही वेळा चौकशी केली नाही, असा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
advertisement
'तपासासाठी बँकेमधील सीसीटीव्ही फुटेज पाहिले जातील. विथड्रॉवल स्लिपमध्ये स्वाक्षऱ्या बघितल्यानंतरच आम्ही या घटनेबाबत सांगू शकतो', असं महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेचे अधिकारी सचिन गोडे म्हणाले आहेत.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 9:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ladki Bahin : भांडणानंतर घर सोडून गेली पत्नी, नवऱ्याने 'दुसरी'ला नेऊन काढले लाडक्या बहिणीचे पैसे!









