रवींद्र चव्हाण ठरले व्हिलन? महाराष्ट्रात एक पालिका भाजप गमवणार? काँग्रेसची जोरदार मुसंडी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Latur Mahanagar Palika Election Result Live Update: "लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात काही शंका नाही" हे वक्तव्य आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं. आता रवींद्र चव्हाणांचं हे वक्तव्य भाजपच्या पराभवाचं कारण ठरताना दिसत आहे.
Latur Mahanagar Palika Election Result Live Update: "लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात काही शंका नाही" हे वक्तव्य आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर राज्यभरातून रवींद्र चव्हाणावर टीका झाली. याचे विविध राजकीय पडसाद उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील लातूरमध्ये जाऊन सारवासारव करावी लागली.
पण रवींद्र चव्हाणांचं हे एक वक्तव्य भाजपला चांगलंच महागात पडल्याचं दिसून येत आहे. कारण लातूरमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे. ७० पैकी ५१ जागांचे सुरुवातीचे कल हाती आले असून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. इथं काँग्रेसनं ३० जागांवर आघाडीवर आहे. तर वंचित बहुजन आघाडी चार जागांवर आघाडीवर आहे. इथं बहुमताचा आकडा ३६ आहे. त्यामुळे काँग्रेसला लातूरमध्ये आपला महापौर करण्यासाठी अवघ्या दोन जागांची आवश्यकता आहे.
advertisement
लातूर महानगरपालिका मतमोजणी निकाल
दुपारी एक वाजेपर्यंत लातूरमध्ये ५१ जागांचे कल हाती आले आहेत. यात काँग्रेस ३० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप १७ जागांवर पुढे आहे. इथं वंचितनं खातं उघडलं असून ४ जागांवर आघाडी उघडली आहे. हाच ट्रेंड कायम राहिला तर पुढील काही वेळात इथं काँग्रेसचा मोठा विजय बघायला मिळू शकतो.
advertisement
२०१७ च्या निवडणूकीत लातूरमध्ये भाजपनं काँग्रेसला टफ फाईट दिली होती. ३६ उमेदवार निवडून आणत एकहाती सत्ता स्थापन केली होती. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपला विजयी घौडदौड राखता आली नाही. रवींद्र चव्हाणांनी केलेलं एक वक्तव्य भाजपच्या पराभवाचं कारण ठरलं आहे. इथं विलासराव देशमुखांच्या निष्ठावंतांनी एकगठ्ठा मतं काँग्रेसच्या पारड्यात टाकल्याचं बोललं जातंय.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 1:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रवींद्र चव्हाण ठरले व्हिलन? महाराष्ट्रात एक पालिका भाजप गमवणार? काँग्रेसची जोरदार मुसंडी









