कॉलेजमधलं प्रेम लॉजपर्यंत पोहोचलं, विश्वासात घेऊन प्रियकराने केला भयंकर कांड, लातूरला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
लातूर जिल्ह्याच्या उदगीर शहरात लग्नाचं आमिष दाखवून २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
उदगीर : लातूर जिल्ह्याच्या उदगीर शहरात लग्नाचं आमिष दाखवून २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी किरण विठ्ठल सूर्यवंशी (रा. गुडसूर, ता. उदगीर) याने पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी किरण सूर्यवंशी हे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. याच दरम्यान त्यांची ओळख झाली आणि मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याचे भासवून आरोपीने तरुणीचा विश्वास संपादन केला. सुमारे पाच महिन्यांपूर्वी आरोपी किरणने तरुणीला उदगीर शहरातील उमा चौकातील साईकृपा लॉज येथे बोलावले.
तेथे गेल्यानंतर आरोपीने तरुणीला 'तू मला खूप आवडतेस, तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवू दे,' असे सांगून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, तरुणीने त्याला स्पष्टपणे नकार दिला. तरुणीचा नकार ऐकून आरोपी संतापला आणि त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीवर त्याने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. ही गोष्ट कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकीही त्याने तरुणीला दिली.
advertisement
या घटनेनंतरही आरोपी किरण सूर्यवंशी तरुणीला वारंवार त्रास दिला. ‘आपण लवकरच लग्न करू आणि आपला सुखाचा संसार थाटू,’ असे खोटे आश्वासन देऊन त्याने तिला आपल्या जाळ्यात अडकवून ठेवले. मात्र, काही दिवसांनी त्याने पुन्हा धमक्या देणे सुरू केले. 'तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, नाहीतर तुझा जीव घेईन,' अशा शब्दात तो तरुणीला धमक्या देऊ लागला.
advertisement
आरोपीच्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने आपल्या कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तात्काळ शनिवारी (१३ सप्टेंबर) उदगीर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी किरण सूर्यवंशीला ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
September 14, 2025 2:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
कॉलेजमधलं प्रेम लॉजपर्यंत पोहोचलं, विश्वासात घेऊन प्रियकराने केला भयंकर कांड, लातूरला हादरवणारी घटना!