मराठा समाज कुणबी असल्याच्या दावा; लातूरमधल्या 'या' गावात सापडला पुरावा
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
सध्या मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी होत आहे.
लातूर, 10 सप्टेंबर, सचिन सोळुंके : सध्या मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी केली आहे. मात्र दुसरीकडे कुणबी समाजाचा मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यास विरोध होत आहे.
मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर आता मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कोणत्या आधारावर देता येईल याबाबतच्या पुराव्यांचा शोध आता राज्य सरकारकडून घेतला जात आहे.कागदपत्रांची तपासणी सुरू असताना लातूर जिल्ह्यातील एकाच गावात मराठी समाज हा कुणबी असल्याच्या तब्बल 45 नोंदी आढळून आल्या आहेत.
कुणबी प्रमाणपत्राच्या पार्श्वभूमीवर सध्या लातूर जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालयात जुन्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. कागदपत्रांची तपासणी सुरू असताना लातूर तालुक्यातील वाडी वाघोली या गावात 1955-56 सालच्या कड पत्रकात 45 नोंदी कुणबी असल्याच्या आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात केवळ एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात नोंदी आढळून आल्यानं हा पुरावा ठरू शकतो अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
Location :
Latur,Latur,Maharashtra
First Published :
September 10, 2023 12:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
मराठा समाज कुणबी असल्याच्या दावा; लातूरमधल्या 'या' गावात सापडला पुरावा


