Crime News : नमस्कार घालणे सख्ख्या भावांच्या जीवावर, लातूरमध्ये दोघांना भोसकलं, एकाचा मृत्यू

Last Updated:

Crime News : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात किरकोळ कारणातून भावांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली.

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
लातूर, (नितिन बनसोडे, प्रतिनिधी) : नमस्कार घातल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. लातूर जिल्ह्यातील होळी गावात ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांची 3 पथके आरोपीच्या शोधात रवाना झाली आहेत.
किरकोळ कारणातून खून
नमस्कार का घातला? या किरकोळ कारणावरुन झालेल्या हाणामारीत एकाचा गुप्तीने भोसकून खून करण्यात आला आहे तर एकजण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना औसा तालुक्यातील होळी गावात काल रात्री उशीरा घडली आहे. होळी या गावातील महादेव केरबा यादव आणि त्यांचा लहान भाऊ संभाजी केरबा यादव सकाळी घरासमोर बसले होते. गावातील काही तरुणांनी त्यांना नमस्कार घातला होता. यावरून वाद वाढला आणि तो वाद विकोपाला गेला. सकाळी शाब्दिक बाचाबाचीही झाली होती. यादव बंधूचे प्रकाश जाधव यांच्या बरोबर अनेक दिवसांपासून वाद होते. त्यातच सकाळी नमस्कार का घातला यावरूनही वाद उफाळून आला होता. रात्री यादव बंधू यांनी सकाळच्या घटनेचा जाब विचारण्यासाठी प्रकाश जाधव यांच्या घराकडे गेले. त्यावेळी प्रकाश व्यंकट जाधव, सतीश व्यंकट जाधव या दोन भावांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार सुरू केले.
advertisement
या जबर हल्ल्यात महादेव याचा जागीच मृत्यू झाला असून लहान बंधू संभाजी गंभीररित्या जखमी झालाय. महादेव यादव याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराचे अनेक वार आहेत. याबाबत औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आरोपी रात्रीच फरार झाले आहेत. त्यांच्या शोधात औसा पोलीसांनी तिन पथके तयार केले आहेत. मध्यरात्रीच आरोपीच्या शोधात पथके रवाना झालेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Crime News : नमस्कार घालणे सख्ख्या भावांच्या जीवावर, लातूरमध्ये दोघांना भोसकलं, एकाचा मृत्यू
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement