Latur News: उदगीरीत लोखंडी खांबाला धडकून ट्रक थेट हॉटेलमध्ये घुसला; थरार घटनेचा CCTV व्हिडिओ

Last Updated:

Latur truck accident News : अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली, बघ्यांची गर्दी झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही, पण मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

News18
News18
लातूर, 09 फेब्रुवारी : लातूरच्या उदगीर शहरात रस्त्यावरून एक ट्रक थेट हॉटेलमध्ये घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घडलेल्या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली, बघ्यांची गर्दी झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही, पण मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
नांदेड रस्त्यावरील उमा चौक येथे एक चालता ट्रक विद्युत तारेच्या लोखंडी पोलला धडकून थेट हॉटेलमध्ये घुसला. हा ट्रक नांदेडच्या दिशेने प्रवास करत होता. अपघाताची घटना घडल्यानंतर वेळीच चालू असलेला विद्युत प्रवाह तत्काळ खंडित केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
view comments
मराठी बातम्या/लातूर/
Latur News: उदगीरीत लोखंडी खांबाला धडकून ट्रक थेट हॉटेलमध्ये घुसला; थरार घटनेचा CCTV व्हिडिओ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement