Dahisar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया, राज ठाकरेंचा 'तो' Video केला ट्विट
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
Dahisar Firing : अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला, यावर आता मनसेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
मुंबई, प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार (Dahisar Firing) करण्यात आला आहे, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मॉरिस नरोना नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळ्या झाडल्या. घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने (Morris Noronha) स्वतःवर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाकडून मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा एका व्हिडीओ देखील ट्विट करण्यात आला आहे.
मनसेची प्रतिक्रिया
'राज्यातील बेछूट गोळीबार, टोळीयुद्ध, गुन्हेगारांचा मुक्त संचार, कोयता गॅंगचा उच्छाद, मुलींचं अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या... ' असं ट्विट मनसेकडून करण्यात आलं आहे. सोबतच राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ देखील मनसेनं यासोबत ट्विट केला आहे.
advertisement
राज्यातील बेछूट गोळीबार, टोळीयुद्ध, गुन्हेगारांचा मुक्त संचार, कोयता गॅंगचा उच्छाद, मुलींचं अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या... #बेधडक #राजदंड pic.twitter.com/CPyn43HkRn
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 9, 2024
दरम्यान या घटनेवर अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.' ही घटना अतिशय चुकीची आहे, अशा पद्धतीनं घटना घडताच कामा नये, सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे, तो शेजारी बसलाय, ते दोघे बोलत आहेत, त्यांचे मैत्रीचे संबंध दिसतायत, ते काम करत आहेत. मात्र तरीही अशी घटना घडली आहे. ही घटना अतिशय चुकीची आहे, माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. अशा घटना कुठेच घडता कामा नये. या घटनेचा नीट तपास व्हायला हवा. खरं काय समोर यायला पाहिजे. विरोधक सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Location :
First Published :
February 09, 2024 10:18 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Dahisar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया, राज ठाकरेंचा 'तो' Video केला ट्विट