Morrisbhai Narona: कोण आहे मॉरिसभाई नरोना? ज्यानं अभिषेक घोसाळकरांवर झाडल्या गोळ्या
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
दहिसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला. या गोळीबाराच्या थरारानं संपूर्ण राज्यच हादरलं आहे. फेसबुक लाईव्ह सुरु असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ही संपूर्ण घटना लाईव्ह व्हिडीओमध्ये कैद झालीय.
मुंबई : दहिसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला. या गोळीबाराच्या थरारानं संपूर्ण राज्यच हादरलं आहे. फेसबुक लाईव्ह सुरु असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ही संपूर्ण घटना लाईव्ह व्हिडीओमध्ये कैद झालीय. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीनंही स्वतःला गोळी मारुन घेतली. या आरोपीचं नाव मॉरिसभाई नरोना आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा हा मॉरिसभाई नेमका आहे तरी कोण?
मॉरिसभाई आणि अभिषेक यांच्यात पहिल्यापासूनच वाद होता. मात्र दोघांमधील वाद संपवून हे दोघे एकत्र आले होते. वाद मिटवण्यासाठी आले मात्र मॉरिसभाईनं अभिषेक घोसाळकर यांचा गेमच केला. संपूर्ण फेसबुक लाईव्हपर्यंतचा प्लॅन रचून मॉरिसभाईनं अभिषेक घोसाळकर यांना मारलं आणि स्वतःचाही जीव घेतला.
advertisement
कोण आहे मॉरिसभाई नरोना?
मॉरिसभाई नरोना स्वतःला एक समाजसेवक असल्याचं सांगतो. कोरोना काळात तो जास्त चर्चेत आला. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळं त्यानं अनेकांना मदतीचा हात दिला. अनेकांना रेशन वाटल्याच्या बातम्या आहेत. काही काळापूर्वीच त्यांची ओळख झालेली मात्र त्यांच्यामध्ये कोणत्या कारणावरुन नेमका वाद झाला हे अस्पष्ट आहे.
मॉरिस भाई बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीसांरखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पत्रकारांनाही धमकावल्याचा आरोपही मॉरिस भाईवर आहे. मॉरिस भाईने वॉर्ड नंबर 1 मधून महापालिकेची निवडणूक लढवली होती. एका महिलेची 88 लाखाची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मॉरिस भाईवर आहे. मॉरिस भाईने महिलेला धमकी दिल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
advertisement
राजकीय वाद आणि आर्थिक वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 08, 2024 10:50 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Morrisbhai Narona: कोण आहे मॉरिसभाई नरोना? ज्यानं अभिषेक घोसाळकरांवर झाडल्या गोळ्या