advertisement

Krushi Market Rate Today: कांद्याची उच्चांकी आवक, मात्र दर घसरले; सोयाबीन आणि मक्याला दर किती?

Last Updated:

सोमवार , दिनांक 3 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, मका व कांद्याची आवक आणि भाव पाहू.

+
Krushi 

Krushi  Market 

मुंबई: सोमवार , दिनांक 3 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, मका व कांद्याची आवक आणि भाव पाहू.
मक्याचे भाव कोसळले: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 19 हजार 426 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी जळगाव मार्केटमध्ये 3500 क्विंटल मक्याची आवक झाली. त्यास कमीत कमी 1050 ते 1866 रुपये दरम्यान प्रतिक्विंटल प्रमाणे बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 14 क्विंटल मक्यास 2075 ते 2250 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.
advertisement
सोयाबीन आवक: राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 23 हजार 761 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये सर्वाधिक 20 हजार, 672 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4003 ते 4558 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये 150 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास 4000 ते 4601 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्यांची आवक: राज्याच्या मार्केटमध्ये 2लाख, 29 हजार 783 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1लाख, 34 हजार 058 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 433 ते जास्तीत जास्त 1924 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1258 क्विंटल पांढर्‍या कांद्यास प्रतीनुसार 200 ते 3100 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Krushi Market Rate Today: कांद्याची उच्चांकी आवक, मात्र दर घसरले; सोयाबीन आणि मक्याला दर किती?
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement