Maharashtra Exit Poll : ठाकरेंना धक्का, शिंदे सुस्साट; महाराष्ट्रात कुणाला किती जागा? एक्झिट पोलचे फायनल आकडे

Last Updated:

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानानंतर एक्झिट पोलचे आकडे आले आहेत. न्यूज18 नेटवर्कने केलेल्या एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

ठाकरेंना धक्का, शिंदे सुस्साट; महाराष्ट्रात कुणाला किती जागा? एक्झिट पोलचे फायनल आकडे
ठाकरेंना धक्का, शिंदे सुस्साट; महाराष्ट्रात कुणाला किती जागा? एक्झिट पोलचे फायनल आकडे
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानानंतर एक्झिट पोलचे आकडे आले आहेत. देशभरातल्या जवळपास सगळ्याच एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा अंदाज आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे, कारण मागच्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
देशभरात मोदी लाट असली तरी महाराष्ट्रात मात्र भाजपचं मिशन 45 प्लस यशस्वी होताना दिसत नाहीये. भारतातलं सर्वांत मोठं न्यूज नेटवर्क असलेलं न्यूज18 नेटवर्कनं भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये महाविकासआघाडीला धक्का बसत असल्याचं दिसत आहे.
कुणाला किती जागा मिळणार?
भाजप- 20 ते 22
शिवसेना (शिंदे)- 11 ते 13
advertisement
राष्ट्रवादी (अजित पवार)- 0 ते 1
महायुती- 32 ते 35
काँग्रेस- 6 ते 9
शिवसेना (उद्धव ठाकरे)- 3 ते 6
राष्ट्रवादी (शरद पवार)- 4 ते 7
महाविकासआघाडी- 15 ते 18
एक्झिट पोलच्या या आकडेवारीनुसार निकाल लागले तर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असेल कारण महाविकासआघाडीमध्ये उद्धव ठाकरेंनी सर्वाधिक 22 जागा लढवल्या होत्या, यात त्यांना फक्त 3 ते 6 जागा मिळतील. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 2019 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. 2019 ला काँग्रेसची फक्त 1 तर राष्ट्रवादीच्या 4 जागा निवडून आल्या होत्या.
advertisement
महाराष्ट्रात भाजपने 28 तर शिवसेनेने 15 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागा लढवल्या होत्या. तर महाविकासआघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वाधिक 22 जागा लढवल्या. काँग्रेसने 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या होत्या.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Exit Poll : ठाकरेंना धक्का, शिंदे सुस्साट; महाराष्ट्रात कुणाला किती जागा? एक्झिट पोलचे फायनल आकडे
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement