Ahmadnagar Politics : निवडणूक कोणतीही असो; सत्तेत कायम नातेवाईकच! नगरच्या राजकारणाचा सोयरे पॅटर्न
- Published by:Shreyas
Last Updated:
नगर जिल्ह्याच्या राजकारणात कोणताही पक्ष मोठा नाही. तर तिथं सर्वात मोठा पक्ष आहे तो म्हणजे सोयऱ्याधायऱ्यांचा पक्ष. पक्ष कुठलाही असो आपला सोयरा निवडून आला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू असतात.
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी
अहमदनगर : नगर जिल्ह्याच्या राजकारणात कोणताही पक्ष मोठा नाही. तर तिथं सर्वात मोठा पक्ष आहे तो म्हणजे सोयऱ्याधायऱ्यांचा पक्ष. पक्ष कुठलाही असो आपला सोयरा निवडून आला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू असतात. या लोकसभा निवडणुकीतही सोयरे कोणत्या पक्षाला मदत करतात, यावर निकाल अवलंबून असणार आहे.
नगर जिल्ह्यातलं राजकारण फक्त सहकारसम्राट, साखर सम्राट आण शिक्षण सम्राट यांच्या भोवती फिरत नाही. तर नगर जिल्ह्यातील राजकारण हे सोयरे सम्राट यांच्या भोवती फिरतं असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. नगर जिल्ह्यात बारा तालुके आहेत. आणि या बारा तालुक्यांमध्ये बारा किल्लेदार आहेत. परिणामी जिल्ह्याचं राजकारण 12 घराण्यांच्या अवतीभोवती फिरत असतं. नगर जिल्ह्यातील बड्या नेत्यांचे एकमेकांसोबत संबंध आहेत. ही मंडळी वेगवेगळ्या पक्षात असली तर नाती मात्र घट्ट आहेत.
advertisement
बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे-पाटील श्रीरामपूर मधील कोल्हे-काळे, यशवंतराव गडाख, प्रसाद तनपुरे बबनराव पाचपुते, चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले पाटील, मोनिका राजळे, मधूकर पिचड हे जिल्ह्यातील मातब्बर नेते आहेत.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची बहीण आप्पासाहेब राजळे यांना सून म्हणून दिली आहे. राजळे कुटुंबातील मोनिका राजळे भाजपच्या आमदार आहेत. तर राजळे यांची मुलगी यशवंतराव गडाख यांच्या घरात दिली आहे. यशवंतराव गडाख यांचे सुपुत्र आमदार शंकराव गडाख हे शिवसेना ठाकरे गटात आहेत. चंद्रशेखर घुले पाटील यांचे बंधू नरेंद्र घुले पाटील यांची यांची मुलगी गडाख कुटुंबात सून म्हणून दिली आहे. घुले कुटुंबातील एक मुलगी कोपरगाव येथील काळे परिवाराची सून आहे. दुसरीकडे भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले त्यांच्या मुलींचे विवाह एनसीपीचे जगताप, कोतकर आणि शिवसेनेचे गाडे यांच्या कुटुंबात केला आहे.
advertisement
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात हाच सोयरे फॅक्टर महत्वाचा ठरतो. नगर दक्षिणमधून भाजपचे सुजय विखे पाटील आणि शरद पवार गटाचे सुजय विखे पाटील मैदानात उतरले आहेत. आता सोयरे ज्याची पाठराखण करणार, त्याचं दिल्लीच तिकीट कन्फर्म होणार हे नक्की.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Apr 14, 2024 11:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ahmadnagar Politics : निवडणूक कोणतीही असो; सत्तेत कायम नातेवाईकच! नगरच्या राजकारणाचा सोयरे पॅटर्न







