advertisement

Loksabha Elections 2024 : महाविकासआघाडीत मिठाचा खडा? ठाकरेंनी घोषित केलेल्या जागेवर पवारांचा नेता 'तुतारी'चा फॉर्म भरणार!

Last Updated:

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटलेला नसतानाच मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या जागेवरच शरद पवारांच्या पक्षाचा नेता पक्षाचा फॉर्म भरणार आहे.

महाविकासआघाडीत मिठाचा खडा? ठाकरेंनी घोषित केलेल्या जागेवर पवारांचा नेता 'तुतारी'चा फॉर्म भरणार!
महाविकासआघाडीत मिठाचा खडा? ठाकरेंनी घोषित केलेल्या जागेवर पवारांचा नेता 'तुतारी'चा फॉर्म भरणार!
राहुल खंडारे, प्रतिनिधी
बुलढाणा : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटलेला नसतानाच मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. बुलढाणा मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाने नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, पण आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रावसाहेब पाटीलही उद्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना बुलढाण्यामध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे.
advertisement
महायुतीकडून प्रतापराव जाधव यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनीही लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करत एकप्रकारे बंडखोरी केल होती. आता महाविकासआघाडीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची घोषणा झालेली असताना आता महाविकासआघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तुतारी चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
advertisement
शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय असलेले रावसाहेब पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यामुळे महाविकासआघाडीत आणखी वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.
महाविकासआघाडीमध्ये वाद
महाविकासआघाडीमध्ये मुंबईतील दोन तसंच सांगली आणि भिवंडी मतदारसंघावरून वाद सुरू आहेत. काँग्रेसचा मुंबईतील दोन आणि सांगली मतदारसंघावर दावा आहे, पण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने या तीनही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला भिवंडीची जागा हवी आहे, पण ही जागा द्यायला काँग्रेस तयार नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Loksabha Elections 2024 : महाविकासआघाडीत मिठाचा खडा? ठाकरेंनी घोषित केलेल्या जागेवर पवारांचा नेता 'तुतारी'चा फॉर्म भरणार!
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement