हे 5 VIDEO मुंबई-पुण्यातील लोकांच्याही डोळ्यात पाणी आणतील, पाहा मध्य महाराष्ट्र-मराठवाड्यात काय घडतंय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, जळगाव जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे महापूर, शेती आणि घरांचे मोठे नुकसान, बळीराजा मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. डोळ्यात पाणी, हातात काटकं, कंबरेपर्यंत पाण्यात उभं राहून रडतोय बळीराजा, पाहून तुमच्या डोळ्यात येईल पाणी VIDEO
डोळ्यात पाणी, हातात काटकं, कंबरेपर्यंत पाण्यात उभं राहून बळीराजा रडतोय. ही भीषण परिस्थिती कुठली दुसरी नाही तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातली आहे. मुंबई पुण्यातील प्रत्येकाने हे व्हिडीओ पाहायला पाहिजेत. जिथे पाऊस पडतोय, वाहतूक कोंडी होतो म्हणून आपण छोट्या गोष्टींने हताश होतो, चिडचिड करतो तिथे बळीराजा मात्र आसवं गाळतोय, स्वत: शेत, प्राणी, पशुधन आणि जीव वाचवण्यासाठी धडपडतोय.
गेल्या 20 वर्षांत जेवढा पाऊस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात झाला नाही तेवढा यंदा सरासरीपेक्षा 105 टक्के जास्त पाऊस झाला. सलग चार दिवसांपासून गावांना पुराचा वेढा पाडला आहे. मुंबई-पुण्यातील लोकांना हे दृश्यं डोळ्यात पाणी आणतील अशी आहेत. ही अंगावर काटा आणणारी दृश्यं महाराष्ट्रातलीच आहेत. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगफुटी सदृश्यं पावसानं हाहाकार माजला आहे.
advertisement
सोलापुरातील लोकांनी फोडला टाहो!
सोलापूरलाही पुराचा मोठा फटका बसलाय. मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापुरातील अनेक तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालंय. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकरी आता सरकारच्या मदतीकडे आस लावून बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या तुफान पावसामुळे सीना नदीला पूर आला. मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापुरातील तालुक्यांना महापुराचा मोठा धोका निर्माण झालाय. सीना नदीकाठच्या ग्रामस्थांनाही यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या 2 दिवसांपासून सीना नदीपात्रात पाणी साचल्याने शेती पाण्याखाली गेली. तर वैराग जवळील इर्ले गावातील मोहोळा माढा तालुक्याला जोडणारा बांधाराही पाण्याखाली गेला. त्यामुळे स्थानिकांचा संपर्कही तुटला. पूरस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
advertisement
लातूरमध्येही भीषण परिस्थिती आहे. जी शब्दात सांगता येणार नाही, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे. संसार उद्ध्वस्त झाला, पै-पै जोडून जमवलेलं घर, शेती सगळं काही पावसानं वाहून गेलं.
advertisement
धाराशिव
धाराशिवमध्ये सुरू असलेल्या मुसळाधार पावसामुळे खैरी नदीला पूर आला आहे. पुरामुळे पंरडा तालुक्यातील शेळगाव गावाला पूर्णपणे पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय. मांजरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलं. मांजरा नदीला पूर आल्यानं नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे कळंबमधील सात्रा,खोंदला,भोपला भाग पाण्याखाली गेला आहे. कळंब शहरातही मांजरा नदीचं पाणी आलं.
advertisement
बीड
जोरदार पावसामुळे सिंदफणा नदीला पूर आला. नदी पात्र तब्बल दोन किलोमीटर पर्यंत पसरलं होतं. यातच अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. नांदूर हवेली गावातही मोठ्या प्रमाणात पाणी आलं. शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी झालंय. त्यामुळे घरांतील वस्तूंसह शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
advertisement
जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील उञाण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय... काही तासांच्या पावसामुळे शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचलं. त्यामुळे परिसरात महापूर आल्यानं शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका फळबागा आणि कापूस पिकाला बसला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 2:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हे 5 VIDEO मुंबई-पुण्यातील लोकांच्याही डोळ्यात पाणी आणतील, पाहा मध्य महाराष्ट्र-मराठवाड्यात काय घडतंय?