निवडून आलेल्या भाजप आमदाराची पंकजांवर सडकून टीका, तुम्ही असं करायला नको होतं...!
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
माझ्या विरोधात लोक उभी करून षडयंत्र रचले गेले. मला पाडण्यासाठी पंकजा मुंडे यांनी व त्यांचे अनंत गर्जे पीए संकेत सानप यांनी लोकांना गाडीत बसून फोन केले पंकजाताई बरोबर नाही असे म्हणत सुरेश धस यांनी विजयी होतात पंकजा मुंडे यांच्या वरती टीका केली आहे.
सुरेश जाधव,बीड : बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी विजयी होताच पंकजा मुंडेंवर टीकास्त्र डागले आहे.पंकजाताई तुम्ही मला धोका द्यायला नको होता.फोन करून लोकांना माझ्या विरोधात काम करायचे सांगितले.लोकसभेला मी प्रामाणिकपणे काम केले मात्र तुम्ही मला धोका दिला हे बरोबर नाही केले, अशा शब्दात सुरेश धस यांनी पंकजा मुंडेवर सडकून टीका केली.
सुरेश धस विजयी झाल्यानंतर त्यांनी आष्टी शहरात विजयी मिरवणुक काढली होती. या मिरवणुकीतून त्यांनी पंकजा मुंडेवर जोरदार टीका केली. पंकूताई तुम्ही लक्ष्मण हाकेंना गोंडस बाळ म्हणाले कुठून आणले हे गोंडस बाळ हाके इथे आष्टी आले आणि भीमराव धोंड्यांना निवडून आणा सुरेश धस पाडा असं सांगितलं यांना सुरेश धस यांना पाडण सोपं नाही.
advertisement
माझ्या विरोधात लोक उभी करून षडयंत्र रचले गेले. मला पाडण्यासाठी पंकजा मुंडे यांनी व त्यांचे अनंत गर्जे पीए संकेत सानप यांनी लोकांना गाडीत बसून फोन केले पंकजाताई बरोबर नाही असे म्हणत सुरेश धस यांनी विजयी होतात पंकजा मुंडे यांच्या वरती टीका केली आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Nov 23, 2024 9:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निवडून आलेल्या भाजप आमदाराची पंकजांवर सडकून टीका, तुम्ही असं करायला नको होतं...!