मोठी बातमी! ऐन निवडणुकीत उमेदवाराच्या वाहनावर हल्ला, कारच दिली पेटवून

Last Updated:

आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे प्रचारांचा जोर वाढला असून आरोप प्रत्यारोप सूरू आहेत. या आरोपप्रत्यारोपात काही उमेदवारांवर हल्ले झाल्याच्या घटना घडली आहे.

विधानसभा उमेदवाराची गाडी पेटवली
विधानसभा उमेदवाराची गाडी पेटवली
यवतमाळ : आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे प्रचारांचा जोर वाढला असून आरोप प्रत्यारोप सूरू आहेत. या आरोपप्रत्यारोपात काही उमेदवारांवर हल्ले झाल्याच्या घटना घडली आहे. अशात आता यवतमाळचे प्रहारचे उमेदवार बिपीन चौधरी यांच्या कारवब हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात त्यांची कार पेटवून देण्यात आली आहे. या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही आहे. मात्र या घटनेने यवतमाळचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बच्चू कडूच्या प्रहारचे उमेदवार बिपीन चौधरी सध्या प्रचार सभेच व्यस्त आहेत. अशात शुक्रवारी रात्री चौधरी यांची चारचाकी गाडी पेटवल्याची घटना घडली आहे. चौधरी यांच्या घराबाहेर सफेद रंगाची चारचाकी उभी होती. ही चारचाकी एका अज्ञात इसमाने पेटवल्याची घटना घडली आहे. नेमकी ही कार कशी पेटवली याची माहिती समोर आली नाही आहे. मात्र या घटनेत आगीचा कोळसा झाला आहे.दरम्यान या हल्ल्याप्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल झाली असून अज्ञात इसमाचा शोध सुरु आहे
advertisement
यवतमाळ विधानसभा मतदार संघात पाच उमेदवार रिंगणात आहेत. मात्र काँग्रेस भाजपमध्ये थेट लढत होणा आहे. काँग्रेसकडून अनिल मांगुलकर आणि भाजपकडून मदन येरावर रिंगणात आहेत.तर प्रहारकडून बिपीन चौधरी, राष्ट्रीय समाज पक्षाचे धरम ठाकूर आणि बहुजन समाज पक्षाचे भाई अमन नरसिंगानी रिंगणात आहेत.या पाच उमेदवारामधून कोण बाजी मारतो. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! ऐन निवडणुकीत उमेदवाराच्या वाहनावर हल्ला, कारच दिली पेटवून
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement