विधानसभेच्या निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच, शिंदे, फडणवीसांच्या नेत्यांचा दावा, पडद्यामागे काय चाललंय?

Last Updated:

विधानसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, असे विधान करून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत बाहेर असल्याचे संकेत दिले होते.

महायुतीत चाललंय काय?
महायुतीत चाललंय काय?
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई :  आगामी विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. आता येत्या 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालात कोण बाजी मारतो? याबाबत एक्झिट पोलमध्ये आडाखे बांधले जात आहेत. पण नेमकी कुणाची सत्ता येते? हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. तत्पुर्वी मुहायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सूरू झाला आहे.
विधानसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, असे विधान करून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत बाहेर असल्याचे संकेत दिले होते. मात्र आता मतदानानंतर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या महत्वाकांक्षा समोर आल्या आहेत.
मुख्यमंत्री पदावरून आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निश्चिचत बावनकुळे यांना त्यांच्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री पद मिळावं असं वाटण सहाजीक आहे. आम्ही ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन लढली आहे. त्यामुळे शिंदेंच्या चेहऱ्याला असलेली पसंती जनतेने मतदानाद्वारे दाखवली आहे. त्यामुळे शिंदे साहेबांचा हक्क आहे. तेच मुख्यमंत्री बनतील अशी आमची अपेक्षा आहे,असे संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
advertisement
प्रदेशाध्यक्षांनी सांगितल्यामुळे तीच आमची अपेक्षा आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मलाही वाटतं. महायुतीत जर भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार असेल, तर ते देवेंद्र फडणवीस असतील. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे भाजप नेते प्रविण दरेकर यांनी सांगितले आहे.
निकाल काहीही लागो, राष्ट्रवादी पक्ष हा गेमचेंजर ठरणारा पक्ष असेल. आंबेगावात शरद पवारांनी इतक्या सभा घेतल्या, पाडा, पाडा तरी लोकांनी जे करायचं तेच केलं. शेवटी मतदार राजा मोठा असतो. अजितदादा या निकालात किंगमेकर राहतील, हे तुम्हाला मी आताच्या घडीला सांगतो, असे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विधानसभेच्या निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच, शिंदे, फडणवीसांच्या नेत्यांचा दावा, पडद्यामागे काय चाललंय?
Next Article
advertisement
Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या मतमोजणीस सुरुवात,  निकालाचा पहिला कल काय?
राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेची मतमोजणीस सुरू, निकालाचा पहिला क
  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

View All
advertisement