Vinod Tawde: विरारमध्ये भाजप-बविआमध्ये तुफान राडा, विनोद तावडेंनाही घेरलं, पैसे वाटपाचा आरोप
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Vinod Tawde News in Marathi: विरारमध्ये भाजप-बविआमध्ये तुफान राडा, विनोद तावडेंनाही घेरलं, पैसे वाटपाचा आरोपविरारमधील एका हॉटेलात घुसून हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे.या हॉटेलात भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि नालासोपारा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजन नाईक उपस्थित होते.
विजय देसाई, वसई-विरार : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी वसई-विरारमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. विरारमधील एका हॉटेलात घुसून हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे.या हॉटेलात भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि नालासोपारा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजन नाईक उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांना घेराव घेत, बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. या घटनेने वसई विरारमध्ये खळबळ माजली आहे.
विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे आले होते. याबातची माहिती नालासोपारा विधानसभेचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांना मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह हॉटेल गाठले होते.यावेळी हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. या आरोपानंतवर क्षितीज ठाकूर यांच्यासह बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरलं आहे. तसेच या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते दाखल झाल्यानंतर मोठा राडा झाला आहे.
advertisement
विनोद तावडेंच्या डायरीत कुणाची नावं? पाहा VIDEO
क्षितीज ठाकूरांसह बविआ कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घूसून विनोद तावडे यांनी घेरलं आहे.तसेच यावेळी एका कार्यकर्त्यांने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेऊन ती तपासली त्यामध्ये पैसै भरलेले लिफाफे सापडले होते. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी हे लिफाफे उघडून पैसे दाखवले आहेत. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल होतं.या संपूर्ण घटनेनंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांनी डांबून ठेवलं आहे.या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत.तसेच भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.
advertisement
या संपूर्ण घडामोडीवर हितेंद्र ठाकुर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. पाच कोटी वाटप होतायत.त्यात अनेक लॅपटॉप,डायऱ्या मिळाल्या आहेत. हे राष्ट्रीय नेते,राष्ट्रीय सरचिटणीस लाज शरम काहीच नाही सगळं घोलुन प्यायले आहे, अशी टीका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. विनोद तावडेंनी मला 25 फोन केले..माफ करा, मला जाऊ द्या असे हितेंद्र ठाकुरांनी म्हणत पोलिसांनी कारवाई करावी, निवडणूक आयोगाने कारवाई करावी,अशी मागणी हितेंद्र ठाकुरांनी केले आहे.
advertisement
Location :
Vasai-Virar City,Thane,Maharashtra
First Published :
November 19, 2024 12:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vinod Tawde: विरारमध्ये भाजप-बविआमध्ये तुफान राडा, विनोद तावडेंनाही घेरलं, पैसे वाटपाचा आरोप


