Maharashtra Assembly Election : पाठिंब्यावरून बविआच्या ठाकुरांनी ठेवली मोठी अट; महायुती, मविआ मान्य करणार का?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांना महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून पाठिंब्यासाठी फोनवरून संपर्क करण्यात आला आहे, असे हितेंद्र ठाकुरांनी सांगितले आहे.
Maharashtra Assembly Election : मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालाची सध्या संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. तत्पुर्वी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांनी छोट्या पक्षांशी आणि अपक्षांशी बोलणी सूरू करत सत्तेची गणित जुळवायला सुरूवात केली आहे. या छोट्या पक्षांमध्ये बहुजन विकास आघाडीचा देखील समावेश होतो. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने या ठाकुरांशी बोलणी केली आहे. मात्र यामध्ये ठाकुरांनी दोन्ही आघाड्यांसमोर एक अट ठेवली आहे. ही अट मान्य करणाऱ्या आघाडीला ते पाठिंबा देणार आहेत.
पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांना महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून पाठिंब्यासाठी फोनवरून संपर्क करण्यात आला आहे, असे हितेंद्र ठाकुरांनी सांगितले आहे. तसेच माझे सगळ्याच पक्षाशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे मी कोणाला ही वर्ज नाही, त्यामुळे उद्या काय निकाल येतो ते पाहूया आणि निर्णय घेऊया, असे ठाकूर म्हणालेत.
advertisement
आम्हाला योग्य तो मानसन्मान द्यावाच लागणार आणि आम्ही योग्य तो मानसन्मान आमच्या विभागासाठी मागतो.आमच्या जनतेसाठी मागतो,असे हिंतेंद्र ठाकुर यांनी सांगितले.
दरम्यान हितेंद्र ठाकुरांचे तीन आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वसई विधानसभा मतदार संघातून हितेंद्र ठाकूर, नालासोपारामधून क्षितीज ठाकूर आणि बोईसरमधून राजेश पाटील यांनी निवडणुक लढवली आहे. या तीनही जागा बविआने जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या वेळेस काय निकाल लागतो, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2024 4:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Assembly Election : पाठिंब्यावरून बविआच्या ठाकुरांनी ठेवली मोठी अट; महायुती, मविआ मान्य करणार का?


