Nilesh Rane : बापाच्या पराभवाचा बदला पोराने घेतला, निलेश राणेंनी वैभव नाईकांना अस्मान दाखवलं

Last Updated:

नारायण राणे यांचे सुपूत्र कुडाळ मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्याविरोधात दोन वेळचे ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांचे आव्हान होते. मात्र या आव्हानाला पेलवत आता निलेश राणे यांनी वैभव नाईकांचा पराभव केला आहे.

निलेश राणे विरूद्ध वैभव नाईक
निलेश राणे विरूद्ध वैभव नाईक
Nilesh Rane News : विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सूपडासाफ करत मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता महायुतीच्या नेत्यांचा विजय जल्लोष सूरू आहे.त्यात कोकणात नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी देखील विजय मिळवला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांचा पराभव करत निलेश राणे यांनी विजय मिळवला आहे. हा विजय मिळवून निलेश राणे यांनी बापाच्या पराभवाचा बदला घेतला आहे.
2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक आणि काँग्रेसचे नारायण राणे यांच्यात लढत झाली होती. या लढतीत वैभव नाईकांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता. या पराभवाची सल नारायण राणे यांना गेल्या 10 वर्षापासून होती.
याच पराभवाचा बदला घेण्यासाठी नारायण राणे यांचे सुपूत्र कुडाळ मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्याविरोधात दोन वेळचे ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांचे आव्हान होते. मात्र या आव्हानाला पेलवत आता निलेश राणे यांनी वैभव नाईकांचा पराभव केला आहे. त्यामुळे निलेश राणे यांनी नारायण राणे यांच्या पराभवाचा बदला घेतला आहे. या विजयाची कोकणात चर्चा आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nilesh Rane : बापाच्या पराभवाचा बदला पोराने घेतला, निलेश राणेंनी वैभव नाईकांना अस्मान दाखवलं
Next Article
advertisement
BMC Election : BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं? Inside Story
BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं?
  • BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं?

  • BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं?

  • BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं?

View All
advertisement