इंदापूर विधानसभा निवडणूक 2024 : अजितदादांच्या कट्टर विरोधकाच्या प्रचारात धाकटे बंधु श्रीनिवास पवार कडाडले, बारामतीचा विकास,धमक्यांवर काय बोलले?

Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024, Indapur Assembly Constituncy : हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांचे कट्टर विरोधक आहेत. याच कट्टर विरोधकाच्या प्रचारात शुक्रवारी श्रीनिवास पवारांनी अजित पवारांना खडेबोल सुनावले आहेत.

धाकटे बंधु श्रीनिवास पवारांचा अजितदादांवर हल्ला
धाकटे बंधु श्रीनिवास पवारांचा अजितदादांवर हल्ला
इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदार संघातील अजित पवारांचे कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारसभेत शुक्रवारी श्रीनिवास पवार सामील झाले होते.यावेळी सभेतून बोलताना श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवला आहे. अजित पवारांना सगळेच त्याच्या हाताखालचे लागतात.त्याला धमकी द्यायची सवय आहे,पण त्याच्या धमकीला घाबरू नका, असे आवाहन श्रीनिवास पवारांनी इंदापूरांना केले आहे.
इंदापूर विधानसभा मतदार संघात अजित पवारांनी दत्तात्रय भरणे तर शरद पवारांनी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली आहे. हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांचे कट्टर विरोधक आहेत. याच कट्टर विरोधकाच्या प्रचारात शुक्रवारी श्रीनिवास पवारांनी अजित पवारांना खडेबोल सुनावले आहेत.
श्रीनिवास पवार यावेळेस म्हणाले, अजित पवारांनी साहेबाना सोडले ते मला आवडलं नाही. तसेच सुप्रियाला पाडायसाठी तू प्रयत्न करतोय हे मला पटल नाही, असे श्रीनिवास पवार यांनी सांगितले. तसेच मी राजकारणात कधी देणार नाही तर साहेबांना साथ द्यायला येणार असल्याचे देखील श्रीनिवास पवार यांनी सांगितले.
advertisement
तसेच बारामतीच्या विकासावर बोलताना श्रीनिवास पवारांनी अजितदादांना लक्ष्य केलं. खरंच बारामतीचा विकास लोकांनी नीट पहिला पाहिजे, असे म्हणत त्यांनी बारामतीत एस्टी स्टँड आहे, पण एसटी चांगल्या नाहीत, असे म्हणत अजितदादांच्या बारामतीच्या विकासाच्या मुद्यावर प्र्श्न उपस्थित केला आहे.तसेच दादाला सगळे त्याच्या हाताखालची लागतात.त्याला धमकी द्यायची सवय आहे त्याला तुम्ही घाबरू नका,असे श्रीनिवास पवार यांनी सांगितले आहे.
advertisement
जनतेने आता निर्णय घेतलाय 84 वयाच्या योद्ध्याला साथ द्यायची आहे. यावेळी सरकार बदलून दाखवायचं. त्यानंतर साहेब दिल्लीला जातील आणि दिल्ली सुद्धा गडबड करतील. तसेच हे सरकार शेतकरी विरोधी आहेत त्याला दणका दिल्याशिवाय ते राहणार नाहीत, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे. तसेच दादा सांगायचे साहेबांचा नाद नका करू आणि दादांनीच साहेबांचा नाद केला केला.पण आता जो बाण सुटलाय तो परत येणार नाही. परत एक होणे नाही, असे म्हणत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची चर्चा श्रीनिवास पवार यांनी फेटाळून लावली.
advertisement
दादांनी रोहित दादाची नक्कल केली. पाच महिन्यानंतर दादांवर तीच वेळ आली. आणि दादाची नक्कल साहेबांनी केली. वेळ बदलायला वेळ लागत नाही. सुप्रियाची नक्कल केली आपल्या छोट्या बहिणीचे नक्कल केली. आता दादा फोन करतायेत कसा आहेस तू, बरा आहेस का तू, येऊन भेट. कुठल्याही माणसाला कमी समजू नका, असा इशारा देखील श्रीनिवास पवार यांनी अजितदादांना दिला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
इंदापूर विधानसभा निवडणूक 2024 : अजितदादांच्या कट्टर विरोधकाच्या प्रचारात धाकटे बंधु श्रीनिवास पवार कडाडले, बारामतीचा विकास,धमक्यांवर काय बोलले?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement