Supriya Sule : बिटकॉईन घोटाळ्याच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंच थेट चॅलेंज, म्हणाल्या, 'मी जबाब...'
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बिटकॉईन घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा सहभाग असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. या आरोपावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Supriya Sule, Audio Clip Viral : महाराष्ट्रात आज 288 विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडतेय. या मतदानाच्या एक दिवस आधी एक ऑडिओ क्लिप समोर आली होती. यामध्ये बिटकॉईन घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा सहभाग असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. या आरोपावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी ऑडिओ क्लिपवर प्रकरणावर भाष्य केले आहे. बिटकॉइन आणि क्रिप्टोवर मीच पार्लमेंटमध्ये प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रक्रियेवर मी सर्वात जास्त प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाज नाही. त्यामुळे या ऑडिओ क्लिप माझा कोणताही संबंध नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ही खोटी ऑडिओ क्लिप आहे, मी सायबरला तक्रार केली आहे, असे देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
advertisement
तसेच मी सगळ्यांचा जबाब द्यायला तयार आहे. ते म्हणतील ती जागा ते म्हणतील तो प्लॅटफॉर्म मी बसून उत्तरं द्यायला तयार आहे, असे चॅलेंज सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली आहे. मी वकिलांशी बोलले आणि क्रिमिनल डिफरमेशनची नोटीस त्यांना पाठवली आहे, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?
‘तुम्ही सर्व बिटकॉईन काढून कॅश का घेत नाही? सध्याच्या किंमती अनुकूल आहेत. निवडणुका जवळ आहेत, त्यामुळे आम्हाला मोठा निधी लागणार आहे. चौकशीबद्दल घाबरू नका, आमचं सरकार आल्यानंतर ते हाताळू. फक्त ते पूर्ण करा.’
advertisement
“Gaurav, we need to ensure 50 crore by next week. It must be delivered to somebody in Dubai. Please ask your friend to have cash ready...”
Amitabh Gupta, Police Commissioner, in a conversation with Gaurav Mehta, an employee of audit firm Sarathi Associates, reveals a deeper… pic.twitter.com/T3s1ONWLW3
— BJP (@BJP4India) November 19, 2024
advertisement
‘गौरव काय चाललं आहे? तुम्ही कुणीही प्रतिक्रिया देत नाही. माझ्यासोबत खेळ खेळू नका. गुप्ता गायब आहे, मग पैशांचं काय झालं? तो म्हणाला सगळे बिटकॉईन आणि कॅश तुमच्याकडे आहे. मला लगेच फोन कर, आम्हाला पैशांची गरज आहे. निवडणुका सुरू आहेत’
‘गौरव तू आम्हाला उत्तर का देत नाहीयेस? आम्हाला पहिले पैसे हवे आहेत’, असं संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 पुष्टी करत नाही.
view commentsLocation :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Nov 20, 2024 8:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Supriya Sule : बिटकॉईन घोटाळ्याच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंच थेट चॅलेंज, म्हणाल्या, 'मी जबाब...'










