हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचा शाप लागला, रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दापोली विधानसभा मतदारसंघातून रामदार कदम यांचे पुत्र योगेश कदम रिंगणात होते. त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उमेदवाराचे आव्हान होते.मात्र हे आव्हान परतवून लावत योगेश कदम जिंकले आहेत.
मुंबई : राज्यात महायुतीच सरकार येणार आहे. हे आता स्पष्ट झालं आहे. कारण महायुतीने 226 जागा जिंकत डबल सेंच्युरी पुर्ण केली आहे. भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादीचा या विजयात मोठा वाटा आहे. त्यामुळे या विजयानंतर महायुतीच्या नेत्याच्या कॉन्फिडेन्स चांगलाच वाढला आहे. अशात आता उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शाप लागलाय. आणि उद्धव ठाकरे राजकारणातून नेस्तनाबूत होतील, अशी जहरी टीका आता शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्याने केली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे नेता रामदास कदम न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. यावेळी बोलताना रामदास कदम यांनी ठाकेरेंवर बोचरी टीका केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शाप उद्धव ठाकरेंना लागला आहे. उद्धव ठाकरे राजकारणातून नेस्तनाबूत झाला. 40 आमदारांना खोके खोके म्हणून बदानाम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. पण आता त्यांना त्यांच्याच पापांची फळ भोगावी लागतायत,अशी जहरी टीका रामदास कदम यांनी केली आहे.
advertisement
तसेच दापोली विधानसभा मतदारसंघातून रामदार कदम यांचे पुत्र योगेश कदम रिंगणात होते. त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उमेदवाराचे आव्हान होते.मात्र हे आव्हान परतवून लावत योगेश कदम जिंकले आहेत.त्यामुळे दापोलीच्या जनतेचे रामदास कदम यांनी आभार मानले आहेत. तसेच त्यांनी महायुतीला भरभरून मतं देणाऱ्या लाडक्या बहिणींचे आभार मानले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2024 3:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचा शाप लागला, रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं


