Maharashtra Elections 2024 : शेवटचे 2 दिवस, मविआत जागा वाटपाचा तिढा सुटेना, 'या' जागांवर उमेदवार जाहीर नाही!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections Mahavikas Aghadi : निवडणूक अर्ज भरण्यासाठी आता दोनच दिवसांचा कालावधी असताना अजूनही काही जागांचा तिढा सुटला नाही.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत अधिकृत जागा वाटप जाहीर करून राज्यात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीच्या विधानसभा जागा वाटपाच्या गोंधळाचा अंक संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. निवडणूक अर्ज भरण्यासाठी आता दोनच दिवसांचा कालावधी असताना अजूनही काही जागांचा तिढा सुटला नाही. मविआकडून पाच, दहा नव्हे तर 23 जागांवर उमेदवार घोषित करण्यात आला नाही. तर, मित्रपक्षांसोबतच्या नेमक्या काय वाटाघाटी सुरू आहेत, यावरही फारशी चर्चा होत नाही.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी राज्यातील दिग्गज नेते जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुंबई ते दिल्ली अशा बैठका सुरू आहेत. मात्र, त्यानंतरही काही जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले नाही. त्याशिवाय, आघाडीमध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याच्या चर्चा आहेत.
किती मतदारसंघात उमेदवार नाही?
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. महाविकास आघाडीचे 23 मतदारसंघातील उमेदवार अजूनही जाहीर झाले नाही. काही जागांवर एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असल्याने उमेदवार जाहीर करण्यास वेळ लागत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, काँग्रेस आणि शरद पवार गटातील तिढा सोडवण्यासाठी रविवारी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली.
advertisement
कोणत्या जागांवर मविआचा उमेदवार नाही...
सिंदखेडा, शिरपूर, अकोला पश्चिम, दर्यापूर, वरूड-मोर्शी, पुसद, पैठण, बोरिवली, मुलुंड, मलबार हिल, कुलाबा, खेड आळंदी, दौंड, मावळ, कोथरूड, औसा, उमरगा, माढा, वाई, माण, सातारा, मिरज, खानापूर
मविआकडून मित्रपक्षांना आतापर्यंत कोणत्या जागा सोडण्यात आल्या?
> भिवंडी पूर्व - सपा
advertisement
> मानखुर्द शिवाजीनगर- सपा
> पेण - शेकाप,
> अलिबाग - शेकाप
> श्रीवर्धन - शेकाप
> कळवण- माकप
> डहाणू - माकप
इतर महत्त्वाची बातमी :
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 28, 2024 8:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 : शेवटचे 2 दिवस, मविआत जागा वाटपाचा तिढा सुटेना, 'या' जागांवर उमेदवार जाहीर नाही!








