Maharashtra Elections : ''मनोज जरांगे यांचे आंदोलन हे...'', अमित ठाकरेंची मराठा आरक्षण आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

Maharashtra Assembly Elections Amit Thackeray On Maratha Reservation : अमित ठाकरे यांनी आपला निवडणूक प्रचारही सुरू केला आहे. 'न्यूज 18 लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत अमित ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे.


''मनोज  जरांगे यांचे आंदोलन हे...'', अमित ठाकरेंची मराठा आरक्षण आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया
''मनोज जरांगे यांचे आंदोलन हे...'', अमित ठाकरेंची मराठा आरक्षण आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया
मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे देखील पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या दोन्ही गटांचे उमेदवार आहेत. अमित ठाकरे यांनी आपला निवडणूक प्रचारही सुरू केला आहे. 'न्यूज 18 लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत अमित ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे.
मनसे नेते आणि माहीम विधानसभेतील उमेदवार अमित ठाकरे यांनी न्यूज 18 सोबत बोलताना मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे. अमित ठाकरे यांना आरक्षणाच्या मागणीबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी म्हटले की, मनोज जरांगे पाटील यांचा मुद्दा चुकीचा नाही त्याचा उद्देश चुकीचा नाही. ते आपल्या मागण्यासाठी माणसांसाठी लढत आहेत. पण त्यांना काय हवे आहे, तर नोकरी आणि शिक्षण हवं आहे. हे नोकरी आणि शिक्षण आपण आरक्षणाच्या माध्यमातून नसलं तरी आपण देऊ शकतो. आरक्षण असल्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास असतो की आपल्या संधी मिळण्याची मोठी शक्यता आहे. ही संधी राज ठाकरे यांचे सरकार आल्यावर मिळणार हेच तुमचं आरक्षण आहे, समजा असेही अमित ठाकरे यांनी म्हटले.
advertisement

राज ठाकरे सगळे प्रश्न सोडवतील...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नोकरी आणि शिक्षणाचा प्रश्न सोडवतील असे अमित ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे यांच्या हातात सत्ता आल्यावर भूमिपुत्रांना नोकरीचा आणि शिक्षणाचा प्रश्नच नसणार, असेही अमित ठाकरे यांनी म्हटले. तुमच्या गरजा मिटल्या की प्रश्न सुटतील आणि आपण हे सहजपणे प्रश्न सोडवू शकतो, असेही अमित ठाकरे यांनी म्हटले.
advertisement

भाषा आणि धर्म महत्त्वाचा...

अमित ठाकरे यांना हिंदुत्वावर प्रश्न विचारले असता त्यांनी म्हटले की, राज ठाकरे यांचे भाषण ऐकल्यानंतर मला धर्म आणि भाषा महत्त्वाचे वाटू लागले. राज ठाकरे पूजा करतात पण अंधभक्ती ते मान्य करत नाहीत. अमित ठाकरे यांनी म्हटले की, धर्म अतिशय महत्वाचा आहे. खूप कमी देश आहे जिथे हिंदू धर्म आहे. हिंदूत्व म्हणजे इतर धर्मांचा द्वेष नाही असेही अमित ठाकरे यांनी म्हटले.
advertisement

इतर संबंधित बातमी : 

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : ''मनोज जरांगे यांचे आंदोलन हे...'', अमित ठाकरेंची मराठा आरक्षण आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement