Maharashtra Elections : राऊत विरुद्ध पाटकरांचा आता थेट संघर्ष, स्वप्ना पाटकर निवडणुकीच्या मैदानात

Last Updated:

Maharashtra Assembly Elections : खासदार संजय राऊत आणि चित्रपट निर्मात्या, व्यावसायिक स्वप्ना पाटकर यांच्या संघर्षाचा दुसरा अंक सुरू होणार आहे


राऊत विरुद्ध पाटकर थेट संघर्ष, स्वप्ना पाटकर निवडणुकीच्या मैदानात
राऊत विरुद्ध पाटकर थेट संघर्ष, स्वप्ना पाटकर निवडणुकीच्या मैदानात
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत आणि चित्रपट निर्मात्या, व्यावसायिक स्वप्ना पाटकर यांच्या संघर्षाचा दुसरा अंक सुरू होणार आहे. हा संघर्ष आता निवडणुकीच्या मैदानात होणार आहे. संजय राऊत यांचे बंधू ठाकरे गटाचे आमदार सुनिल राऊत यांच्या विरोधात स्वप्ना पाटकर निवडणूक लढवणार आहेत. विक्रोळी मतदारसंघातून स्वप्ना पाटकर निवडणूक लढवणार आहे. पत्राचाळ, खिचडी कंत्राट यासारख्या आपण केलेल्या भ्रष्टाचारावर भाष्य होऊ नये यासाठी साक्षीदारांना अत्याचाराच्या धमक्या देणाऱ्या घाबरट आणि पळकुट्या लोकांशी आता मी थेट दोन हात करणार अससल्याचे स्वप्ना पाटकर यांनी म्हटले.
पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणात ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती. या प्रकरणात संजय राऊत सध्या जामिनावर आहेत. ईडी चौकशी स्वप्ना पाटकर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणेने राऊतांवर कारवाई केली. ईडी चौकशी सुरू असताना संजय राऊत यांनी आपल्याला धमकावले असल्याचा आरोपही स्वप्ना पाटकर यांनी केला होता. पाटकर यांना राऊतांनी कथित शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. स्वप्ना पाटकर यांनी ईडीला पत्र लिहुन आपल्याला धमकी मिळत असल्याची तक्रार पत्राद्वारे केली. या प्रकरणातील आरोपी आणि त्याचे गुंड मला सतत धमकावत आहेत आणि यात इतर लोकांचाही सहभाग असू शकतो. मला सतत धमक्या दिल्या जात आहेत. तपासादरम्यान दिलेले वक्तव्य बदलण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे पाटकर यांनी म्हटले.
advertisement

आता निवडणुकीच्या मैदानात संघर्ष...

स्वप्ना पाटकर यांनी आता विक्रोळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या मतदारसंघातून संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत आमदार आहेत. सुनिल राऊत यांनी आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

स्वप्ना पाटकरांनी काय म्हटले?

स्वप्ना पाटकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, सत्यमेव जयते! स्त्री दुर्गा असते लक्ष्मी असते. तिचा सन्मान करता येत नाही त्यांना आयुष्यात काहीच नीट करता येत नाही. माझा लोकशाही आणि न्यायालयावर प्रचंड विश्वास आहे. लोकशाही मार्गाने लोकशाहीच्या महोत्सवात विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज घेत आहे. भ्रष्टाचार, महिला सुरक्षा, शासन-प्रशासनाबाबत रोज सकाळी भोंगे वाजवणारे लोक स्वतः कुपमंडूक वृत्तीचे आहेत. महिलांचा सन्मान आणि त्यांची सुरक्षितता यावर त्यांची अत्यंत गंभीर मते आहेत. मात्र प्रत्यक्षात एका महिलेचे शोषण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली असल्याचे पाटकर यांनी म्हटले.
advertisement
advertisement
पाटकर यांनी पुढे म्हटले की, भ्रष्टाचारातून मिळणारे लोणी ओरपणाऱ्या लोकांना लोकशाहीच्या मार्गाने धडा शिकवण्याची वेळ आली आहे. मात्र प्रत्यक्षात एका महिलेचे शोषण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. भ्रष्टाचारातून मिळणारे लोणी ओरपणाऱ्या लोकांना लोकशाहीच्या मार्गाने धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तो लढा सुरू ठेवतानाच आता विक्रोळी मतदारसंघातून मी जनतेच्या न्यायालयात दाद मागणार आहे. त्यासाठी विधानसभा निवडणुकीत उतरत आहे. दररोज सकाळी उठून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारे लोकप्रतिनिधी असूच शकत नाहीत असेही स्वप्ना पाटकर यांनी म्हटले. त्यांचा विकृत चेहरा रोज सकाळी उघडा पडतोच. पत्राचाळ, खिचडी कंत्राट यासारख्या आपण केलेल्या भ्रष्टाचारावर भाष्य होऊ नये यासाठी साक्षीदारांना अत्याचाराच्या धमक्या देणाऱ्या घाबरट आणि पळकुट्या लोकांशी आता मी थेट दोन हात करणारच असल्याचा निर्धार स्वप्ना पाटकर यांनी केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : राऊत विरुद्ध पाटकरांचा आता थेट संघर्ष, स्वप्ना पाटकर निवडणुकीच्या मैदानात
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement