Maharashtra Cabinet: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा, कॅबिनेटचे ९ मोठे निर्णय
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Maharashtra Cabinet Decision: राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करण्याबरोबरच ९ महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले.
मुंबई : महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ मध्ये सुधारणा करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शिवाय मुंबईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेल्या झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
राज्यातील जवळपास २० जिल्ह्यांत विशेषत: मराठवाडा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेकांचे संसार वाहून गेले, गुरेढोरे मेली, शेती खरवडून गेली. या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजही जाहीर करण्यात आले. शिवाय विविध विभागांशी संबंधित ९ निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस होते.
राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले ९ मोठे निर्णय
(उद्योग विभाग)
advertisement
महाराष्ट्र राज्याचे रत्ने व दागिने धोरण – २०२५ जाहीर. सोने, चांदीचे दागिने, हिरे-रत्ने यांच्याशी निगडीत उद्योग-व्यवसाय वाढीस चालना मिळणार. एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, पाच लाख नवीन रोजगार निर्मितेचे उद्दिष्ट.
(नगर विकास विभाग)
राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रियेचे धोरण. सांडपाण्यावरील प्रक्रीयेमुळे आणि त्याच्या पुनर्वापराव्दारे चक्रीय अर्थव्यवस्थेस (सर्क्युलर ईकॉनॉमी)ला चालना. सांडपाण्याचे शाश्वत व्यवस्थापन, पर्यावरण रक्षण, आरोग्यदायी परिसर या संकल्पनेला बळ मिळणार. राज्यातील ४२४ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये धोरण राबविण्यात येणार
advertisement
(महसूल विभाग)
तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ मध्ये सुधारणा करण्यात येणार. अधिनियमातील कलम ८ (ब) चे परंतुक वगळून कलम ९ मध्ये पोट-कलम (३) नंतर पंरतुक समाविष्ट करण्यात येणार.
(गृहनिर्माण विभाग)
मुंबईत झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना (Slum Cluster Redevelopment Scheme) राबविणार.
advertisement
(महसूल विभाग)
अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेअंतर्गत ई-बस डेपो व चार्जींग व्यवस्थेकरिता मौजा बडनेरा येथील २ हेक्टर ३८ आर जमीन ३० वर्षासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय.
(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक निवासी आश्रमशाळा, ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन आश्रमशाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना २ लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय. अशा ९८० आश्रमशाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार.
advertisement
(वस्त्रोद्योग विभाग)
खाजगी सूतगिरण्यांना एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८ अंतर्गत सहकारी सूतगिरण्यांप्रमाणे युनीट मागे ३ रुपये वीज अनुदान सवलत लागू करण्याचा निर्णय. राज्य औद्योगिक समुह विकास योजनेंतर्गत क्लस्टरमधील सुतगिरण्यांना दिलासा मिळणार.
(वस्त्रोद्योग विभाग).
यंत्रमागधारकांना वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार. शासन निर्णय जारी झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत नोंदणी करावी लागणार.
advertisement
(विधि व न्याय विभाग)
अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय, या न्यायालयाकरिता आवश्यक पदांना मान्यता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 5:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Cabinet: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा, कॅबिनेटचे ९ मोठे निर्णय