Mahapalika Election Declared: मुंबई पुण्यासह 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण कार्यक्रम
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Maharashtra Mahapalika Election Full Schedule : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा धुरळा खाली बसताच राज्यातील महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या २८६९ जागांसाठी निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली. राज्यातील सर्व महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होईल. निवडणूक जाहीर झाल्याने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून महापालिका निवडणुकीची तयारी करीत असलेल्या उमेदवारांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी ३ कोटी ४८ लाख मतदार आहेत. संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर दुहेरी तारांकित (डबल स्टार) असणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयुक्त सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेतली.
मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला तेव्हापासून शहराचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे निवडणूक पुढे ढकलत गेली. आता जवळपास साडेतीन वर्षांनंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. त्याचबरोबर पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, अमरावती या आणि अशा अनेक महापालिकांच्या निवडणुका देखील रखडल्या होत्या.
advertisement
कोणत्या महापालिका निवडणुकांसाठी मतदान?
मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, धुळे, इचलकरंजी, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, नांदेड-वाघाळा, परभणी, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर
| महापालिका निवडणूक 2025 | मतदानाची तारीख | निकालाची तारीख | एकूण जागा |
| मुंबई | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 277 |
| नवी मुंबई | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 111 |
| ठाणे | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 131 |
| कल्याण-डोंबिवली | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 122 |
| १६ जानेवारी २०२६ | |||
| मीरा-भाईंदर | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 96 |
| सोलापूर | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 113 |
| सांगली-मिरज-कुपवाड | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 78 |
| परभणी | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 65 |
| नांदेड-वाघाळा | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 81 |
| भिवंडी-निजामपूर | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 90 |
| उल्हासनगर | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 78 |
| वसई-विरार | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 115 |
| पुणे | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 162 |
| पिंपरी-चिंचवड | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 128 |
| नागपूर | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 151 |
| नाशिक | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 122 |
| छत्रपती संभाजीनगर | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 113 |
| पनवेल | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 78 |
| अहिल्यानगर | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 68 |
| अकोला | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 80 |
| अमरावती | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 87 |
| चंद्रपूर | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 66 |
| धुळे | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 74 |
| इचलकरंजी | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 76 |
| जळगाव | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 75 |
| जालना | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | |
| कोल्हापूर | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 92 |
| लातूर | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 70 |
| मालेगाव | १५ जानेवारी २०२६ | १६ जानेवारी २०२६ | 84 |
advertisement
महापालिका निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
अर्ज दाखल करण्याची तारीख- २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
अर्जाची छाननी- ३१ डिसेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची तारीख- २ जानेवारी २०२६
निवडणूक चिन्ह वाटप- ३ जानेवारी २०२६
मतदान कधी?- १५ जानेवारी २०२६
निकाल कधी?- १६ महापालिका
| महापालिका निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम | |
| अर्ज दाखल करण्याची तारीख- | २३ डिसेंबर २०२५ |
| अर्जाची छाननी- | ३१ डिसेंबर २०२५ |
| अर्ज मागे घेण्याची तारीख- | ०२ जानेवारी २०२६ |
| निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम यादी | ०३ जानेवारी २०२६ |
| मतदान- | १५ जानेवारी २०२६ |
| निकाल- | १६ जानेवारी २०२६ |
advertisement
कोणत्या महापालिका उमेदवारांसाठी किती खर्च करण्याची मर्यादा?
अ- वर्ग १५ लाख
ब वर्ग- १३ लाख
क वर्ग- ११ लाख
ड वर्ग- ९ लाख
घाईने मुंबई निवडणुका जाहीर करण्यावर शिवसेनेचा आक्षेप?
महापालिका निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी अद्याप जाहीर झालेली नसताना राज्य निवडणूक आयोगाकडून घाईघाईने निवडणुका जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. आज १५ डिसेंबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सायंकाळपर्यंत ती ना आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, ना महापालिकेत.
advertisement
मतदार यादीतील प्रक्रिया अपूर्ण असताना निवडणुकांची घोषणा करणे म्हणजे मतदारांच्या हक्कांवर घाला आणि लोकशाही प्रक्रियेची थट्टा आहे. अंतिम मतदार यादी सार्वजनिक होईपर्यंत व त्यातील त्रुटी दूर होईपर्यंत निवडणुकांची घोषणा करू नये, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
हे पत्र शिवसेना पक्ष सचिव खासदार अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे. आयोगाने या प्रकरणात निष्पक्षता व पारदर्शकता दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2025 4:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mahapalika Election Declared: मुंबई पुण्यासह 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण कार्यक्रम











