IAS Transferred: मंत्रिमंडळ बैठकीदिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, फडणवीसांचा निर्णय
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Maharashtra IAS Transferred: राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील पाट बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे हातात घेतल्यापासून प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट होत आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील पाच बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून विशेष करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदिवशी आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यातही पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंंत्री फडणवीस यांनी घेतला.
कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या?
१. राहुल रंजन महिवाल (IAS:RR:२००५) यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती
advertisement
२. प्रकाश खपले (IAS:SCS:२०१३) आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय महामंडळ मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती
३. डॉ. मंजिरी मानोलकर (IAS:SCS:२०१६) व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे येथे आयुक्त म्हणून नियुक्ती
४. त्रिगुण कुलकर्णी (IAS:SCS:२०१६) उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची एससी आणि एचएससी बोर्ड पुणे येथे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
advertisement
५. अंजली रमेश (IAS:RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांची मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजी नगर येथे आयुक्त म्हणून नियुक्ती
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 7:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS Transferred: मंत्रिमंडळ बैठकीदिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, फडणवीसांचा निर्णय


