ठाण्यात 'ती' घरं घेणाऱ्यांना 1 टक्के मुद्रांक शुल्क, पालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
- Published by:Sachin S
Last Updated:
हे रहिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून मजुरीची कामं करतात. त्यामुळे त्यांना सदनिका घेताना करारनामा दस्त नोंदणीचा मुद्रांक शुल्क अधिभार न सोसणारा आहे
ठाणे : राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आता सगळ्यांना महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहे. सर्वच पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या बालेकिल्ल्यासाठी महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बीएसयुपी सदनिकांमध्ये घर घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत मिळणार आहे, अशी घोषणाच एकनाथ शिंदे यांनी केली. या निर्णयामुळे ठाणे विभागातील ६३४३ गरीब कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील जे.एन.एन.यु. आर.एम. आणि बी.एस.यू.पी. योजनेअंतर्गत प्रकल्पबाधीतांना वैयक्तिक सदनिका करारनामा करताना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देतानाच त्यासाठी प्रतिदस्त १०० रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
केंद्र शासन, राज्य शासन आणि ठाणे महानगरपालिकेचा संयुक्त उपक्रम असलेल्या जे.एन.एन.यु.आर.एम., बी.एस.यू.पी. योजना शहरी गरीबांकरिता आहेत. ठाणे महानगरपालिकेमार्फत या दोन्ही योजनेतंर्गत विकसित करण्यात आलेले भूखंड सध्याच्या झोपडपट्टयांच्या जागी असून तेथील नागरिकांचे पुर्नवसन बी.एस.यु.पी. सदनिकांमध्ये केलं जातं.
advertisement
6343 गरीब कुटुंबांना होणार लाभ
view commentsहे रहिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून मजुरीची कामं करतात. त्यामुळे त्यांना सदनिका घेताना करारनामा दस्त नोंदणीचा मुद्रांक शुल्क अधिभार न सोसणारा आहे. तसंच यातील काही कुटुंबांना मिळणाऱ्या सदनिकांकरीता प्रत्येकी ५६ हजार ते १ लाख ३४ हजार इतका अधिभार भरावा लागणार होता. ही बाब विचारात घेऊन या योजनेंतर्गतच्या शहरी गरीबांकरिता एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. या निर्णयाचा लाभ ठाणे विभागातील 6343 गरीब कुटूंबांना होणार आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
November 18, 2025 7:54 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
ठाण्यात 'ती' घरं घेणाऱ्यांना 1 टक्के मुद्रांक शुल्क, पालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा


