LIVE NOW

Nagarparisha-Nagarpalika elections Live : 24 नगरपरिषद, 76 नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

Last Updated:

Nagarparisha-Nagarpalika elections 2025: बारामती, अंबरनाथसह 24 नगरपरिषदा आणि 76 नगरपालिका नगरपंचायतींमध्ये आज मतदान, निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार. 154 नगरसेवक पदांसाठीही मतदान.

News18
News18
राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केलेल्या बारामती, अंबरनाथसह राज्यातील 24 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.. तर 76 नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील नगरसेवक पदाच्या 154 जागांसाठीही आज मतदान होतंय. आज मतदान पार पडल्यानंतर राज्यातील 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी 21 डिसेंबरला जाहीर केला जाणार आहे.
Dec 20, 20258:52 AM IST

बीड-परळी- नगरपालिका निवडणुकीमध्ये चार वार्डातील नगरसेवकासाठी आज प्रत्यक्ष मतदान

बीडचा परळी नगरपालिका निवडणूक चार वार्डातील उमेदवारासाठी प्रत्यक्ष मतदाननाला सुरवात. बीडच्या परळी नगरपालिका निवडणुकीमध्ये चार वार्डातील नगरसेवकासाठी आज प्रत्यक्ष मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे तर परळी मध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Dec 20, 20258:52 AM IST

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीनंतर मिरवणुकीसाठी बंदी

छत्रपती संभाजीनगर – उद्या होणार सिल्लोड नगर परिषदची मतमोजणी होणार आहे. नगर परिषदनिकाला नंतर मिरवणुकीस बंदी, पोलिस प्रशासनाने विजयी मिरवणुकीवर बंदी, शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात

Dec 20, 20258:50 AM IST

सातारा: फलटण आणि महाबळेश्वर नगरपालिकासाठी आज मतदान

फलटण नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत आहे. फलटणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी रामराजे गटाकडून शिवसेनेच्या चिन्हावर अनिकेतराजे नाईक निंबाळकर तर माजी खा. रणजीत नाईक निंबाळकर यांचे बंधू भाजपच्या चिन्हावर समशेर सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे.

advertisement
Dec 20, 20258:50 AM IST

बुलढाणा निवडणूक अपडेट : देऊळगाव राजा येथे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी आज मतदान

 

न्यायालयाने आदेशाने पुढे ढकलण्यात आलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातही देऊळगाव राजा येथे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत जात आहे. दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी पाहुयात..

Dec 20, 20258:49 AM IST

Nagarparisha-Nagarpalika elections Live : भुसावळमध्ये दोन प्रभागांसाठी आज मतदान, सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरवात

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत तीन प्रभागांसाठी न्यायालयीन अपील दाखल असल्याने येथील निवडणूक स्थगित करण्यात आल्या होत्या मात्र यातील एका प्रभागात उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याने आज रखडलेल्या निवडणुकांमध्ये दोन प्रभागांसाठी मतदान होत असून सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. यात प्रभाग क्रमांक चार ब 11 ब साठी ही मतदान प्रक्रिया आज पार पडणार असून उद्या नगरपरिषद निवडणुकीचा संपूर्ण निकाल हा जाहीर होणार आहे. दरम्यान 18 दिवसाच्या कालावधीनंतर होणाऱ्या या दोन प्रभागांच्या निवडणुकीमध्ये मतदार नेमका कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

Dec 20, 20257:34 AM IST

MahanagarPalika election : शिवसेना-भाजपात जागावाटपावरून रस्सीखेच

शिवसेना-भाजपात जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळतोय…..मुंबई, ठाणे संभाजीनगरमध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण झालाय…सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय.

advertisement
Dec 20, 20257:33 AM IST

Mahanagar Palika election : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची लवकरच घोषणा

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकींची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा लवकरच होणार असल्याची चर्चा आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. ठाकरेंच्या पक्षाचे नेते अनिल परब यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. जवळपास अर्धा तास जागावाटपावर बैठक झाली असून लवकरच युतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती नितीन सरदेसाईंनी दिलीये.

Dec 20, 20257:32 AM IST

Nagarpalika elections Live : अंबरनाथच्या चिखलोली परिसरातील प्रभाग क्रमांक 5च्या मतदान केंद्रावर गोंधळ झाला

अंबरनाथच्या चिखलोली परिसरातील प्रभाग क्रमांक 5च्या मतदान केंद्रावर गोंधळ झालाय. EVMमध्ये छेडछाड केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि छेडछाड केलेल्या मशीन बदलण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेने केली आहे. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मशीनचा सील कायम असल्याचं म्हटलंय, जर काही छेडछाड केली असेल तर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलंय…

Dec 20, 20257:09 AM IST

Nagarparisha-Nagarpalika elections Live : 24 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी आज मतदान

24 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. राज्यभरातील दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 मतदान करण्याची वेळ असणार आहे. ‘न्यूज18 लोकमत’वर मतदानाची प्रत्येक अपडेट

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagarparisha-Nagarpalika elections Live : 24 नगरपरिषद, 76 नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement